लाखनी,दि.11- श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने लाखनी येथे कुणबी समाज वरवधू परिचय मेळाव्याचे आयोजन काल रविवारी (दि.10) करण्यात आले होते.
स्थानिक स्व. निर्धनराव वाघाये पाटील सभागृहात आयोजित या मेळाव्याला आमदार डॉ परिणय फुके, माजी आमदार मधुकर कुकडे, सुनील मेंढे, दादा टिचकुले, भाग्यश्री गिलोरकर, विनायक बुरडे, निलकंठ कायते, सदानंद इलमे, अविनाश ब्राम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. फुके आणि नगराध्यक्ष सुनील मेंढे यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, समाजातीस नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्राप.सदस्य, ज्येष्ठ नागरिक, आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment