अहमदाबाद,दि.21 - गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नवविनर्वाचित आमदार कांधल जडेजा यांना अटक झाली आहे. कांधल जडेजा यांच्यावर पोरबंदर जिल्ह्यात दंगल घडवल्याचा आणि पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप असून कांधल जडेजा यांच्यासह अन्य सात जणांना अटक करण्यात आली आहे. पोरबंदर जिल्ह्यात मतदानावरुन झालेल्या भांडणानंतर कांधल जडेजा यांनी समर्थकांसोबत पोलिस ठाण्यात जाऊन अधिका-यांना मारहाण करत सरकारी संपत्तीचं नुकसान केले होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक शोभा यांनी दिली आहे.
कांधल जडेजा आपले दोन भाऊ करण जडेजा, काना जडेजा आणि डझनभर कार्यकर्त्यांसोबत पोलीस ठाण्यात घुसरले होते. त्यांचा राजकीय शत्रू म्हणून ओळखल्या जाणा-या सम्राट गोगान यांनी हल्ल्याच्या भीतीने पोलिस ठाण्यात आश्रय घेतला होता. कांधल जडेजा समर्थकांसोबत आपल्यावर हल्ला करेल, अशी भीती त्यांना होती. बुधवारी कांधल जडेजा यांनी पोलिस ठाण्यात घुसून त्यांना मारहाण केली होती. Thursday, 21 December 2017
गुजरातमधील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अटकेत
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment