देवरी,दि.23: महाराष्ट्र – छत्तीसगड राज्याच्या सीमेवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर असलेल्या देवरी (सिरपूर चेक पोस्ट) वर शुक्रवारी (दि.२२) रोजी एका ट्रक चालकाकडून नोव्हेबर व डिसेबर महिन्याची बनावट सी.एफ (केज्युअल शुुुल्क) पावती पकडली. यामुळे सीमा तपासणी नाक्यावर खळबळ उडाली असून बनावटी पावती देणारी टोळी सक्रीय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चेक पोस्टवर कार्यरत वाहन निरीक्षक आनंद मोड यांनी ट्रक क्र. एमएच १२ एलटी ४१७८ चे कागदपत्रे तपासले असता वाहन चालकाकडे नोव्हेंबर २०१७ ची ०७४२६०४ व डिसेंबर २०१७ ची २३३९५२ क्रमाकांची पावती आढळून आली. मोड यांनी दोन्ही पावत्यांची नोंद रजिस्टमध्ये तपासणी केली असता पावत्या बनावट असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही पावत्यांमध्ये एक-एक हजार रुपयाची नोंद असून प्रभारी अधिकारी सीमा तपासणी नाका देवरीचा शिक्का सुद्धा लावलेला आहे.मोड यांनी सदर ट्रक चालकाला पकडून देवरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट सरकारला सर्वात जास्त महसूल देणाऱ्या देवरी चेक पोस्टवर दररोज तीन ते चार हजार वाहने ये-जा करतात.
वाहतूक निरीक्षकाद्वारे प्रत्येक वाहनाकडून सी.एफ. शुल्क एक हजार रुपये घेवून त्याची पावती दिली जाते. यातून दर महिन्याला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. मागील काही दिवसांपासून बनावट पावती देणारी एक टोळी देवरी येथे सक्रीय असल्याची चर्चा होती. यापूर्वी देखील बनावट पावत्या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment