Thursday 14 December 2017

देवरी येथे 'सुदृढ विध्यार्थी सुदृढ भारत' प्रकल्प साजरा



ब्लॉसम शाळेच्या विध्यार्थ्यांनी दिली ग्रामीण रुग्णालयाला भेट

देवरी:14 डिसें
देवरी येथील आगळ्यावेगळ्या सहशालेय उपक्रम आणि प्रकल्पासाठी लोकप्रिय असलेली आई एस ओ मानांकन प्राप्त ब्लॉसम पब्लिक स्कुलच्या विद्याथ्यांनी आज देवरी च्या ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन 'सुदृढ विध्यार्थी सुदृढ भारत' हा सहशालेय उपक्रम साजरा केला.
सदर प्रकल्पाचे आयोजक आणि मार्गदर्शक शाळेचे मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी विध्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनाची दूर दृष्टी ठेवून आपल्या सहकार्यासह ग्रामीण रुग्णालयातील प्रत्येक्ष स्थिती सोयी सुविधा आणि आरोग्याची जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि रुग्णासोबत जवळून संवाद साधता यावा या उद्देशाने सदर प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले.
या प्रकल्पाला यशस्वीरूप देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय देवरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक धुमानखेडे, डॉ. सचिन बनसोडे आणि डॉ.अर्चना बनसोडे यांनी आणि सर्व सहकार्यांनी विध्यार्थ्यांना आरोग्यदायी सवयी आणि सुदृढ आरोग्य या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
रुग्णालयाची कार्यपद्धती,  ओपेशन थिएटर,ओ टी पी, प्रयोगशाळा ,एक्स रे, १०८ रूग्नवाहिका या सर्व विभागाची प्रत्येक्षरीत्या माहिती देण्यात आली.
रुग्णाची आत्मीयता समजता यावी आणि धीर देण्यासाठी विध्यार्थी आणि शिक्षकांनी रुग्णांना फळांचे वितरण केले.

विध्यार्थी जीवनात रुग्णालयाविषयी सविस्तर माहिती असावी, आरोग्यदायी सवयीची माहिती असावी, आणि सुदृढ भारत हि संकल्पना सिद्ध व्हावी या उद्देशाने सदर शालेय भेट आयोजित करण्यात आलेली होती.
विध्यार्थ्यांनी सर्व कर्मचारी आणि रुग्णासोबत संवाद साधला.
सदर प्रकल्पाच्या यशासाठी मुख्याध्यापक सुजित टेटे सह, नितेश लाडे, हर्षदा चारमोडे, वैशाली मोहुर्ले, वैशाली टेटे आणि राहुल मोहुर्ले यांनी सहकार्य केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...