Thursday 21 December 2017

महिला आमदारांची सुरक्षा धोक्यात; विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार


नागपूर,दि.21 : अधिवेशनाच्या काळात शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, पण आमदार निवासात महिला आमदार असुरक्षित असल्याचा आरोप आमदार ज्योती कलानी, विद्या चव्हाण आणि दीपिका चव्हाण यांनी गुरुवारी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.
ज्योती कलानी यांनी सांगितले की, मी आमदार निवासात प्रारंभीच्या इमारतीत खोली क्र. २१४ मध्ये निवासाला आहे. मंगळवारी माझ्यासोबत आमदार विद्या चव्हाण आणि दीपिका चव्हाण निवासाला होत्या. रात्री १२ च्या सुमारास खोलीचा दरवाजा मोठ्याने ठोठावला. दरवाजा उघडला तेव्हा दोन तरुण समोर उभे होते. काही विचारायच्या आतच त्यांनी मला प्रश्न विचारणे सुरू केले तेव्हा विद्या चव्हाण यांनी दरवाजा बंद करण्यास सांगितले. पुन्हा पहाटे ५ वाजता कुणीतरी दरवाजा मोठ्यामोठ्याने ठोठावला. त्यावेळी दरवाजा उघडला नाही. पहाटे ५ नंतर आम्हा तिघींना झोप आली नाही. या घटनेची तक्रार आमदार निवासाच्या सुरक्षा रक्षकाकडे केली. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सुरक्षेचा प्रश्न गुरुवारी सभागृहात मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण ते आम्हाला शक्य झाले नाही. या प्रकरणी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार करणार आहोत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...