गोंदिया,दि.30 : महाराष्ट्रात गोंडगोवारी जमात अस्तित्वात नाही. अनुसूचीमध्ये गोवारी हेच गोंडगोवारी आहेत. ही बाब काही आदिवासी नेत्यांच्या दबावामुळे शासन स्वीकारायला तयार नाही. गोवारी जमातीतील गैरआदिवासी दर्शवून त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय छळ केला जात आहे. आपल्या हक्कासाठी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा. ११४ शहिदांच्या रक्ताला न्याय मिळवून देण्यासाठी मतभेद विसरून एक व्हा. आपला सर्वांचा विजय हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
खिल्या-मुठ्या येथे गोवारी बांधवांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष, नगरसेवक व पालकमंत्री यांनी खिल्या-मुठ्या देवस्थानाकरिता जागा देण्याचे आश्वासन दिले. उद्घाटन नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष माधव चचाणे होते. दीप प्रज्ज्वलन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुणे म्हणून म्हणून भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, न.प. बांधकाम सभापती घनशाम पानतावणे, अमृत इंगळे, नगरसेवक सचिन शेंडे, गुलाब नेवारे, का.ज. गजबे, डी.टी. चौधरी, गोविंद शेंडे, नरेश चौधरी, विनायक शर्मा, शेखर कोहळे, सुशील राऊत, मधू नेवारे, शीला नेवारे उपस्थित हते.
संचालन सी.ए. आंबेडारे यांनी केले. आभार ज्ञानेश्वर राऊत यांनी मानले. कार्यक्रमासाठी रमेश नेवारे, मोतीराम नेवारे, राधेशाम कोहळे, पवन काळसर्पे, मोहन शहारे, श्याम शेंदरे, सी.बी. कावरे, संजू राऊत, शामबाबू चामलाटे, रतिराम राऊत, राजेश नेवारे, राजेश वघारे, खेमचंद राऊत, अनिल शेंदरे यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment