Thursday 21 December 2017

मोदींनी आता हिमालयात जावे- जिग्नेश मेवाणी




Modi was old, he should go to Himalyala - Khichak critic of Jignesh Merchant | मोदी आता म्हातारे झाले, त्यांनी हिमालायाकडे प्रस्थान करावं - जिग्नेश मेवाणींची खोचक टीकानवी दिल्ली, दि.21 -  गुजरातमधील  निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही राजकीय नेत्यांची चिखलफेक काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश करणाऱ्या जिग्नेश मेवाणी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर टीकेचे प्रहार सुरूच ठेवले आहेत. दरम्यान, मेवाणी यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींवर स्वैर टीका केली. म्हातारपण आलेल्या मोदींनी आता संन्यास घेऊन हिमालयात जावे, असा खोचत सल्ला त्यांनी मोदींना दिला आहे. या टीकेबद्दल खुद्द राहुल गांधींनी माफी मागण्यास सांगितले तरी मी माफी मागणार नाही, असेही ते सांगायला विसरले नाही.

मेवाणी पुढे म्हणाले की,  2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज  आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र  मोदी आता म्हातारे झाले आहेत. ते आपली जुनी रटाळ भाषणे लोकांना सुनावत आहेत. त्यामुळे त्यांनी आता राजकारणातून विश्रांती घेत निवृत्ती स्वीकारली पाहिजे. तसेच हिमालयात जाऊन तेथेचा पुढील जीवन जगावं," या वक्तव्यानंतर माफी मागणार का अशी विचारणा केली असता मेवाणी यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला. "खुद्द राहुल गांधींनी जरी मला माफी मागायला सांगितले तरी मी माघार घेणार नाही. मी माझ्या वक्तव्यावर कायम आहे, असे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये भाजपाच्या जागांमध्ये झालेल्या घटीबाबत त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा गुजरातमध्ये 150 जागा जिंकण्याचा दावा करत होते. मात्र त्यांचे पुरते गर्वहरण झाले आहे. 2019 सालीसुद्धा हेच होईल. हा आमच्या आंदोलनाचा विजय आहे. आम्ही सभागृहापासून रस्त्यापर्यंत आपल्या आंदोलनावर भर देऊ आणि यांना 2019 साली सत्तेतून खाली खेचू. देशात फूट पाडणाऱे राजकारण जनतेला समजले आहे. त्यामुळे देशाला आता आमच्यासारख्या दलित, युवा आंदोलनांमधून समोर आलेल्या युवकांची गरज आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...