Thursday 21 December 2017

आमदार पाटणीवरील आरोप बिनबूडाचे,ताटकेंची तक्रार मागे


वाशिम,दि.20 (आकाश पडघन) - भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विरोधात   मंगरुळपीर येथील तथाकथित समाजसेवक महादेवराव ताटके यांनी राजकीय दबावामुळे आणि आणि त्याची मानसिक स्थिती बिघडल्याने वाशिम शहर पोलीस स्टेशनला 16 डिसेंबरला तक्रार  दाखल केल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र देत तक्रार मागे घेतल्याने ताटकेंचा खोटारडेपणा उघड झाला.तर आमदार राजेंद्र पाटणी यांच्यावर ताटके यांनी  मुख्यमंत्री यांना कमिशन देण्यासाठी मागितलेल्या 10 लाख रुपयाचा आरोप बिनबुडाचा असल्याचे समोर आले आहे. ताटके यांनी कुणाच्या इशाऱ्यावरून तक्रारी केली त्यामागचा मास्टर माईंड कोण?  हा एक तपासाचा भाग ठरणार आहे .  समाजसेवक महादेवराव ताटके यांनी  दि. 19 डिसेंबरला शहर पोलीस स्टेशनला हजर होत लेखी दिले की दि 16 डिसेंबरला दिलेल्या रिपोर्टप्रमाणे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या सोबत कोणताही 10 लाख रुपयांचा व्यवहार झाला नाही.बोलचाल झाली नाही. आमदार पाटणी यांनी कोणतीही जातीवाचक शिवीगाळ केली नाही.  पाटणी यांच्या घरी गेलो नाही.त्यांचा भाऊ  विवेकला भेटलो नाही. मला कोणाकडूनही धमक्या मिळाल्या नाहीत .त्यामुळे कोणतीच घटना घडली नाही. सदरचा रिपोर्ट हा काही राजकीय वर्तुळातील दबावामुळे व मानसिक स्थिती बरोबर नसल्यामुळे व बिघडल्यामुळे देण्यात आली असूून तक्रारीमध्ये नमूद घटना घडलीच नसल्याची कबुली दिल्याने एकच खळबळ माजली आहे..संपूर्ण मजकूर चुकीचा,बिनबुडाचा ,तथ्यहीन असत्य असल्यामुळे तो रिपार्ट मागे घेत असल्याचा अर्ज पोलीस स्टेशनला दिला  महादेवराव ताटके यांचा  आरोप व घुमजाव मुळे राजकारण ढवळून निघाले आहे.Facebook

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...