देवरी,दि.२८- सिद्धार्थ हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय डवकी येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे मोठ्या थाटात काल बुधवारी (दि.२७) आयोजन करण्यात आले.
या सोहळ्याचे उद्घाटन आमदार संजय पुराम यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. चंद्रसुरेश डोंगरवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले, अंजना खुणे,लखनसिंह कटरे, मिqलद रंगारी, सविता बेदरकर, विद्यालयाचे संस्थापक चैतराम मेश्राम, प्राचार्य महेंद्र मेश्राम, डवकीचे सरपंच उमराव बावणकर, प्रमोद संगीडवार, लक्ष्मण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना ना. बडोले म्हणाले, ‘‘शिक्षण आणि परिश्रमाशिवाय यश मिळणे कठीण आहे. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्याथ्र्यांच्या आंतरिक गुणाचा विकास होतो.‘‘
आमदार पुराम म्हणाले की, जीवनाचा मार्ग अत्यंत खडतर असा असतो. शिक्षणाच्या माध्यमातून त्याचे निर्वाण करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अंजना खुणे, श्री बडोले आणि डॉ. डोंगरवार यांचा सत्कार करण्यात आले. याप्रसंगी अंजना खुणे यांच्या कवितेचा श्रोत्यांनी आस्वाद घेतला. इतर मान्यवरांनी सुद्धा यावेळी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचलन व्ही. टी. पटले यांनी केले. उपस्थितांचे आभार जागेश्वर ठवरे यांनी मानले.आयोजनाच्या यशस्वितेसाठी मुकेश टेंभरे, नरेश निखारे, कार्तिक कोकावार, भूपेंद्र कुलसुंगे, प्रकाश लांजेवार, योगेंद्र बोरकर, हिरालाल खोब्रागडे, राजेंद्र बिसेन आदींनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment