Thursday 21 December 2017

शिक्षण सभापतींचा स्वीय सहायक ‘एसीबीच्या जाळ्यात’


Akola Zilla Parishad;Acb trap employee taking bribe | अकोला जिल्हा परिषद; शिक्षण सभापतींचा स्वीय सहायक ‘एसीबीच्या जाळ्यात’
अकोला,दि.21 : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सभापत पुंडलिकराव अरबट यांचा स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरे (५१) याला गुरुवारी दुपारी एका तक्रारकर्त्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली.
शिक्षण सभापती यांचा स्वीय सहायक असलेला श्रीकांत ठाकरे हा जिल्हा परिषदेच्या शाळांना होणाऱ्या पोषण आहारात खंड पडल्याबाबतची माहिती विचारून तक्रारकर्त्यास त्रास देत होता. शिक्षण विभागाच्या बैठकीतही ठाकरे हा मुद्दा वारंवार उपस्थित करून तक्रारदारास त्रास देत होता. पोषण आहारात खंड का पडला, याबाबतची माहीती द्यायची नसेल, तर त्या मोबदल्यात दर महिन्याला पाच हजार रुपये द्या, अशी मागणी श्रीकांत ठाकरे तक्रारदाराकडे करत होता. या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे श्रीकांत ठाकरेची तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून एसीबीचे पोलिस अधीक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वात गुरुवार, २१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजताचे सुमारास सापळा रचण्यात आला. यावेळी श्रीकांत ठाकरे याला लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. एसीबीचे पोलिस अधीक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक इश्वर चव्हाण, सैरिशे, सुनील, संतोष, प्रवीण यांनी ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...