अर्जुनी मोरगाव,दि.२६- स्वातंत्र्याला ७१ वर्षलोटून गरीब शेतकरी आजही पारतंत्र्यात आहे.इंग्रजाची आणेवारीपध्दत कायम असून देश जरी स्वातंत्र्य झाला असला तरी शेतकरी नाही.मी अर्जुनी मोरगावातून वनहक्काची लढाई सुरु केली तीच लढाई पुढेही कायम राहणार असून सध्याचे राज्यातील फसवणारे सरकार असून शेतकèयांची कर्जमाफी देखावा असल्याची टिका माजी खासदार नाना पटोले यांनी केली.
खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज नाना पटोले अर्जुनी मोरगाव येथे दाखल होताच त्यांच्या स्वागतासाठी हजारोच्या संख्येने नागरिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आयोजित कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.या कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष एड.के.आर.शेंडे,चंद्रशेखर ठवरे, माजी जि.प.सभापती धन्नालाल नागरीकर,राजेश नंदागवळी,भागवतपाटील नाकाडे,बँकेचे संचालक प्रमोद लांजेवार,माजी जि.प.सदस्य भरत खंडाईत,सविता ब्राम्हणकर,होमराज कापगते,नानाजी मेश्राम,जगदिश मोहबंशी,नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे,आशा झिलपे,जागेश्वर धनभाते,नितिन पुगलीया,डॉ.विवेक मेंढे,सुभाष राऊत,इंजि.कुमार जांभुळखर,अब्दुल सत्तारभाई रिजवी,प्रज्ञा गणविर,विलास गायकवाड,गजानन नाकतोडे,अनिरुध्द ढोरे यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पटोले म्हणाले की मी स्वतःसाठी नव्हे शेतकरी,शेतमजुर ओबीसीसांठी राजीनामा दिलेला आहे.निवडणुकीत खोटे आश्वासन देऊन भाजप सत्तेची फळे चाखत असून स्वामीनाथन आयोग लागू न करणारी ही सरकार ५६ इंचीची कशी असू शकते अशी टिका करीत देशाच्या सिमेवर जवान शहिद होत असतांना चौकीदारी करणारे पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याकडे चहापानाला जातात अशी टिका केली.सोबतच ज्यांना निवडून आणण्याची ताकद आमच्यात असते तेवढीच ताकद त्यांना पराभूत करण्याची आमच्यात आहे हे इतरांनी विसरु नये अशी खोपरकळी सुध्दा त्यांनी मारली.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मोठया संख्येने उपस्थित शेतकरी,शेतमजुरामुळे भाजपला qचतेचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र भाजपचा एकही पदाधिकारी या कार्यक्रमाकडे फिरकला नसल्याचे वृत्त आहे.
No comments:
Post a Comment