भंडारा,दि.09ः- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या बाबत अपशब्द बोलणार्या आयुध निर्माणीच्या अधिकार्यांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जवाहरनगर येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
आयुध निर्माणी येथिल कॅटिंग परिसरात ६ डिसेंबरच्या सकाळी ९.३0 ते १0 वाजता आयुध निर्माणी विविध कर्मचारी संघटनेचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला निर्माणीतील कामावर उपस्थित कर्मचार्यांची संख्या अधिक असल्याने कार्यक्रम थोडे लांबणीवर पडले. यातून कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी विलंब झाल्याने निर्माणीतील अप्पर महाप्रबंधक सैनिकी बग्गा यांनी विलंबाने आलेल्या कर्मचार्यांना विचारणा केली. तेव्हा कर्मचार्यांनी अभिवादन कार्यक्रमात सहभागी झाल्याचे सांगताच बग्गा यांनी बाबासाहेबांबाबत अपशब्द काढले. हा प्रकार माहित होताच तणावाची स्थिती निर्माण झाली. विविध संघटनेच्या वतीने निर्माणीतील वरिष्ठ महाप्रबंधक यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करुन दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निर्माणी वसाहतीतील हेमा पार्क जवाहरनगर येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा काढण्यात आला. जवाहरनगर पोलिस ठाण्यात दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन पोलीस अधिकार्यांना देण्यात आले. डॉ. बाबासाहेबाबाबद अपमानजनक शब्द वापरल्या प्रकरणी ७ डिसेंबर रोजी आयुध निर्माणी परिसरात तणावाचे वातावरण होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी चौकशीकरिता शैंकी बग्गा यांना ताब्यात घेतले असून त्यांना भंडारा न्यायालयात हजर करण्यात रवाना केले.जवाहरनगर पोलिसांनी सैनिकी बग्गा याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.
No comments:
Post a Comment