शिक्षक समिती देवरीचा मोर्च्याला पाठिंबा
देवरी,दि.१७- महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने हिवाळी अधिवेशनात जुनी पेंशन लागू करण्याच्या मागणीला घेऊन भव्य मुंडण आणि आक्रोश मोच्र्याचे आयोजन उद्या सोमवारी (दि.१८) करण्यात आले आहे. या मोच्र्याला देवरी तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन जिल्हा सचिव संदीप तिडके यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाèयांना नवीन परिभाषित अंशदायी पेंशन योजना लागू केली. यामुळे सेवा निवृत्तीच्या फायद्यांपासून कर्मचाऱ्यांना वंचित केले गेले आहे. शिक्षक समिती ही जुनी पेंशन योजना या कर्मचाèयांना लागू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आली आहे.
उद्या सोमवारी राज्य विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आपल्या न्याय मागण्यांचा आवाज शासनाच्या कानावर टाकण्यासाठी राज्यभरातून मुंडण आणि आक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याला शिक्षक समितीचा संपूर्ण पाठिंबा आहे. यामुळे मोर्च्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संदीप तिडके, गजानन पाटणकर, विनोद बहेकार, सुरेश कश्यप, जी.एम बैस, दीपक कापसे, सुनील चव्हाण, नरेद्र अमृतकर, विशाल कच्छवाय, उत्तम टेंभरे, आर.एस, रघुते, आर.एच वाघाडे, आर डी गणवीर, भरत खोब्रागडे, मिथून चव्हाण, वर्षा वाल्दे, ज्योती डाबरे, रीता चांदेवार, सपना शामकुवर, प्रगती निखाडे आदींनी तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांना केले आहे.
No comments:
Post a Comment