नागपूर,दि.21- साप्ताहिक बेरारटाईम्सने वर्ष 2018 चे नवे कॅलेंडर आकर्षक रूपात प्रकाशित केले असून ते ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध आहे. या नवीन कॅलेंडरचे प्रकाशन काल बुधवारी (दि.20) नागपूर येथे करण्यात आले.
बेरारटाईम्सच्या 2018 सालच्या या नव्या कॅलेंडरचे प्रकाशन विधान परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे हस्ते नागपूर येथे आयोजित ओबीसी युवक-विद्यार्थी महाअधिवेशनात करण्यात आले. यावेळी आमदार सुनील केदार, प्रा. अशोक जीवतोडे, गिरीष पांडव, राजेश नंदागवळी, भूमेश्वर चव्हाण, दिनेश कोहळे, बेरारटाईम्सचे मुख्य संपादक खेमेंद्र कटरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी बेरारटाईम्सने आपल्या ग्राहक आणि वाचकांसाठी या कॅलेंडरमध्ये बहुजन समाजातील महापुरुष आणि बळिराजाचे रंगीत चित्र प्रकाशित केले आहे. या कॅलेंडरचे सहकार्य मूल्य केवळ 20 रुपये ठेवण्यात आले असून ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. बहुजन समाजातील वाचक या कॅलेंडरसाठी बेरारटाईम्सच्या कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन प्रकाशकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment