देवरी 21 (तालुका प्रतिनिधी) - येथील नामांकित ब्लॉसम पब्लिक शाळेमध्ये ब्लॉसम महोत्सव 2017-2018 च्या क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्धघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमात अतिथी म्हनूण देवरीचे डॉ. लक्ष्मीकांत चांदेवार, संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल आणि प्राचार्य सुजित टेटे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आले. डंबल्स प्रात्यक्षिक सादर करून अतिथीचे स्वागत करण्यात आले.
अतिथीनीं क्रीडागणाचे भूमिपूजन करून आणि फीत कापून या क्रीडासत्राची सुरुवात केली. शाळेतील सर्व विध्यार्थी या संमेलनात सहभागी झालेले आहेत. कबड्डी, व्हालीबॉल, रनिंग, चेस, मैदानी खेळ आणि विविध शालेय सांघिक व वयक्तिक खेळाची सुरुवात करण्यात आली. डॉ. चांदेवार यांनी खेळाचे विध्यार्थी जीवनातील महत्व समजावून सांगितले. सुजित टेटे यांनी बौद्धिक विकासासाठी शारीरिक विकास यावर मार्गदर्शन केला.
सदर कार्यक्रमाच्या यशासाठी क्रीडा शिक्षक राहुल मोगुर्ले, भोजराज तुरकर, अजित टेटे, वैशाली टेटे, वैशाली मोहुर्ले हर्षदा चारमोडे, स्वप्नील पंचभाई आणि सर्व शालेय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केला.
No comments:
Post a Comment