आमगाव दि.१०: : येथील मुख्य शहराच्या मध्यभागी असलेल्या भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत शुक्रवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
येथील भारतीय स्टेश्न बँक येथे ८ डिसेबर दुसरा शनिवार सुटीचा दिवस असल्याने शुक्रवारी रात्री ८ वाजतापर्यंत बँकेत कर्मचारी काम करीत होते. त्यानंतर कर्मचारी ८ वाजनंतर बँक बंद करुन घरी गेले. पण शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी बँके बाहेर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून केबल कापले. तर बँकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप कटरने तोडून बँकेत प्रवेश केला. त्यानंतर चोरांनी बँकेच्या आत मुद्देमालाचा शोध घेत कॅशरुम आणि लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला. लॅकरचे कुलूप न तुटल्याने त्यांचा प्रयत्न फसला. त्यामुळे चोरांनी बँकेतील साहित्य अस्ताव्यस्त केले. मात्र यावेळी बँकेत लावलेले सायरन वाजले नाही हे विशेष. रात्री ८ वाजेपर्यंत बँकेत काम करणाºया कर्मचाºयांनी बँकेची रोकड, मुद्देमाल असलेल्या लॉकरचे कुलूप बंद असल्याची खातर जमा करुन घेतली होती. त्यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. शनिवारी (दि.९) सकाळी ग्राहकांना बँकेतील मुख्य प्रवेश द्वारावरील कुलूप तुटलेले आढळल्याने त्यांनी याची माहिती बँक व्यवस्थापकाला दिली.
या वेळी बँक प्रशासनातील कर्मचारी, पोलीस प्रशासनाने बँकेत धाव घेत माहिती घेतली. दरम्यान या घटनेमुळे आमगाव येथे चांगलीच खळबळ उडाली आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. या घटनेचा तपास आमगाव पोलीस करित आहेत.
No comments:
Post a Comment