Thursday, 14 December 2017

तेलंगणाच्या जंगलात झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा

हैदराबाद,दि.14(वृत्तसंस्था): नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत तेलंगणा राज्याच्या विशेष पोलीस दलाला मोठे यश मिळाले असून 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आले आहे.आज गुरूवारी सकाळी तेलंगणातील टेकुलापल्लीच्या जंगलात भेटापुडी गावाजवळ झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. चकमक झालेल्या ठिकाणाहून विशेष दलाने मोठ्या प्रमाणात शस्त्रसामग्री हस्तगत केली आहे. याशिवाय दैनंदीन दिवसता वापणा-याही अनेक वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. नक्षलवाद्यांच्या संशयित हालचालीची कुणकुण पोलिसांना मिळाली होती अशी माहिती आहे. सध्या याठिकाणी सुरक्षारक्षकांनी शोधमोहिम मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे. यापूर्वी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...