सडक अर्जुनी,दि.7ः- तालुक्यातील सौन्दड/ पीपरी या दोन गावांना जोडण्याकरीता शासनाने प्रधानमंत्री सडक योजने अंतर्गत कोट्यावधी रुपयाच्या निधी मंजूर करून पुलाचे बांधकाम केले.त्यातच चुलबंद नदी पात्रातील रेतीचे मोठ्याप्रमाणात अवैधरित्या गौण खनिज चोरले असून त्या उत्खणन करताना पुलाच्या खाली खड्डे पडल्यामुळे या पुलाला वाळू माफियांच्या अवैधरित्या उत्खननामुळे धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे पूल कोसळण्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली असून शासनाच्या निकषानुसार पुलापासून 100 मीटर अंतरावर वाळूचा उपसा करता येत नाही.परंतु तालुक्यातील महसुल अधिकारी,तलाठी व पोलीस प्रशासनाच्या मिलीभगतामूळे वाळूमाफिया खुले आम पुलाखालून रेतीचा उपसा करु लागले आहेत.एकीकडे रेल्वे पूल आहे तर दुसरीकडे प्रधान मंत्री योजनेतून बनवलेले हा बुडीत पूल ठरला आहे.सौन्दड, पिपरी या बंद घाटातून ,शेत शिवारातील छुप्प्या मार्गाने चोरी केली जात आहे.त्यामुळे शेतमार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. सौन्दड,पिपरी,रांका या तिन्ही गावातील जनतेला रात्रभर वाहनांच्या वाहतुकी मुळे झोपणे कठीण झाले आहे. काही वाहनांना नंबर प्लेट सुद्धा नाही परिणामी अपघात घडला तर तो वाहन/चालक कशा ओळखणार हा प्रश्न सुध्दा उपस्थित झाला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment