Friday, 8 December 2017

*अशोका टोल प्लाझाकडून वाहनांची सर्रास लूट*


*अशोका टोल प्लाझाकडून वाहनांची सर्रास लूट*

देवरी: 8 साकोली येथे राष्ट्रीय महामार्ग ६ वर स्थित अशोका टोल प्लाझा सध्या वाहन चालकाची सर्रास लूट करतांना दिसत आहे. एका वाहन चालकाने 5डिसेंबर ला सायं 7:09 वाजता 24 तासाची पास काढली होती ही पास 6 डिसेंबर सायं 7:09 पर्यंत वैद्य होती. सदर वाहन 7:09 च्या अगोदर टोल प्लाझा वर उभे होते परंतु तेथील कर्मचाऱ्याच्या हलगर्जी पणा मुळे लांब ट्रक ची लाईन लागलेली होती. सदर वाहन 7:11 ला  टोल काउंटर वर पोहोचले असतांना वाहन चालका कडून पुन्हा टोल वसूल करण्यात आला. असा प्रकार कित्तेक वाहन चालका सोबत होत असल्याचे बोलले जात आहे. एकी कडे शासनाने व्हीआईपी कल्चर बंद केले असतांना राजकीय लोकांना आणि काही कार्ड धारकांना विशेष दर्जा देऊन टोल माफी केली जाते. परंतु प्रामाणिकपणे टोल काढणाऱ्या वाहन चालकांकडून सर्रास टोल च्या नावावर लूट केल्याचे चित्र साकोली टोल प्लाझा वर बघायला मिळते.
सदर कृत्यावर राजकीय लोक आणि जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी लक्ष देतील कि त्यांना टोल माफी आहे म्हणून आपली गाडी सरळ काढतील, याकडे जनतेचे लक्ष आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...