Friday, 8 December 2017

खासदार नाना पटोलेंचा भाजपला रामरामः खासदारकी सोडली


बेरारटाईम्सने नानाभाऊ डिसेंबरमध्ये खासदारकी सोडणार असल्याचे भाकित केले होते, ते भाकित आज खरे ठरले.

गोंदिया,दि.8ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी आज 8 डिसेंबरला खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे सोपविला असून भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.पटोले हे गेल्या अनेक दिवसापासून भाजपमध्ये बंडखोर नेते म्हणून ओळखले जात होते.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबतही त्यांचे चांगले संबध राहिले नाही.त्यांनी शेतकरी,ओबीसी मुद्यावर अनेकदा सरकारकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला.परंतु सरकारने लक्ष दिले नाही असे पटोले वारंवार सागंत होते तसेच सरकारीच भूमिका ही शेतकरी व बहुजनविरोधी असल्याचे म्हटले होते.विशेष म्हणजे बेरार टाईम्सने खासदार नाना पटोले हे डिसेंबरमध्ये भाजपसह खासदारकी सोडणार असे भाकित वर्तविले होते.पटोले आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील राजकीय भूमिका जाहिर करणार आहेत.सोबतच ते काँग्रेस प्रवेश करणार अशी चर्चा असून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पद पटोलेंना मिळणार अशी चर्चा वर्तविली जात आहे.


नाना पटोले यांनी २००८ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला. पुढे 2014 मध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा मतदारसंघात पराभव केला होता. मात्र अलीकडे ते स्वपक्षाच्या धोरणांवर नाराज आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करताना दिसत होते. सोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य करत आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनात पटोले हे पूर्ण वेळ सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...