Friday, 8 December 2017

GST : भाजपला निवडणुक आयोगाचा दणका



अहमदाबाद,दि.08 - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपला जोरदार दणका   दिला आहे. केंद्र सरकारने नुकतीच जीएसटीतील १७८ वस्तूंवरील करात कपात केली आहे.त्याचा निवडणुकीत फायदा घेण्यासाठई प्रचार करू नका, असे आदेशच निवडणूक आयोगाने दिले आहेत. ऐन मतदानाच्या आधी निवडणूक आयोगाने दिलेल्या या आदेशामुळे भाजपला जोरदार झटका बसला आहे.

जीएसटीमधील वस्तूंच्या करपातीचा मुद्दा पुढे करून मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला होता. त्यालाच निवडणूक आयोगाने सुरुंग लावला आहे. मात्र कोणत्याही वस्तूचं वा सेवांचं नाव न घेता कर प्रणाली सुलभ करण्याच्या प्रक्रियेबाबत बोलण्याची मुभा मात्र आयोगानं भाजपला दिली आहे.


सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीत जीएसटी आणि नोटाबंदीचा मुद्दा गाजत आहे. भाजपकडून जीएसटी आणि नोटाबंदीचे फायदे सांगितले जात आहेत तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी त्याचे तोटे सांगत सरकारच्या धोरणांवर टीका करत आहेत. दुसरीकडे गुजरातमधील व्यापाऱ्यांनीही जीएसटीला विरोध करत सरकारविरोधातील संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे जीएसटीच्या मुद्द्यावरून भाजपला गुजरातमध्ये फटका बसण्याची चिन्हे होती. त्यामुळे केंद्र सरकारने जीएसटीतील १७८ वस्तूंवर करकपात केली होती.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...