Friday, 8 December 2017

अनमोल इंडिया कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल


भंडारा,दि.08ः-अधिक परताव्याचे आमिष दाखवून हजारो नागरिकांची तब्बल पावणेचार कोटींनी फसवणूक करणार्‍या अनमोल इंडिया हर्बल फार्मिंग एन्ड डेअरिज केअर कंपनी लिमिटेडच्या ८ संचालकांवर भंडारा पोलिसात आर्थिक फसवणूक, महाराष्ट्र ठेवी हितसंबंध जोपासणे कायदा व बॅंकींग ऑफ मनी सक्यरुेलटर स्किम अँक्ट अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कंपनीचे विविध राज्यात जाळे असून या कंपनीविरोधात महाराष्ट्रात गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.मो. जावेद मैमन, जुनैद मैमन, खालीद मैमन, हाजी उमर मैमन, रा. अमनोल टॉवर, नागपूर, फातिमा बानो, हमीद मैमन रा. रायपूर, सिबू खान रा. राजनांदगाव, तारकेश्‍वर लिल्हारे रा. बालाघाट अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सदर आरोपींनी अनमोल इंडीया एग्रो हर्बल फार्मिंग अँन्ड डेअरिज केअर नावाची कंपनी उघडून त्यात एजंटांच्या माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणुकदारांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून दैनिक, मासिक, त्रैमासिक, अर्ध वार्षिक, एकमुस्त अशा विविध ठेवी योजनेंतर्गत पैसे गोळा केले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सुमारे १५0 एजंट नेमून १0 हजार नागरिकांकडून पैसे गोळा करण्यात आले. यात ग्रामीण गुंतवणुकदारांचा समावेश अधिक आहे. भंडारा येथे राष्ट्रीय महामार्गावर कंपनीचे कार्यालय सुरु करण्यात आले. सुरुवातीला कंपनीने काही जणांचे पैसे परत केले. परंतु, ऑगस्ट २0१५ पासून कंपनीकडून पैसे मिळणे बंद झाले. कंपनीचे कार्यालयही जानेवारी २0१७ पासून बंद पडले. त्यामुळे एजंट व गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली. या कंपनीने गुंतवणुकदारांना तब्बल ३ कोटी ७१ लाख ५0 हजार २३३ रुपयांचा गंडा घातला आहे.
काही एजंट व गुंतवणूकदारांनी कंपनीच्या संचालकांना पैसे परत मागण्यासाठी वारंवार तगादा लावला. परंतु, त्यांनी टाळाटाळ केली. अखेरीस गुंतवणूकदारांनी भंडारा पोलिसात धाव घेत फसवणुकीची तक्र ार दाखल केली. पोलिसांनी सदर आरोपींवर भादंविचे कलम ४0९, ४२0, ३४, सहकलम ३,४, महाराष्ट्र ठेवी हितसंबंध जोपासणे कायदा १९९९ सहकलम ६, बॅंकींग ऑफ मनी सक्यरुलर स्किम अँक्ट १९७८ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक थेरे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...