Friday, 8 December 2017

भंडारा कारागृहात कैदयांकरीता जनजागृती कार्यक्रम

गोंदिया,दि.७ : भंडारा कारागृह येथे बंदी असलेल्या कैदयांकरीता नुकताच जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्य न्याय दंडाधिकारी प्र.ह.खरवडे यांनी सांगितले की, तडजोड गुन्ह्यांमध्ये ३७९, ५०६ व ४०६ इत्यादी गुन्ह्यांमध्ये समजोता होवू शकतो. सदर गुन्ह्यांमध्ये तडजोड करुन घेतली तर आरोपीचा फायदा होवून निर्दोष सुटका होवू शकते. कैदयांच्या अधिकारामध्ये विशेष हक्काची रजा, पॅरोल, संचित रजा इत्यादींचा फायदा मिळत असतो. तसेच पोलीस अधिकाऱ्याने एखादया आरोपीला विना वारंट पकडले असेल तर आरोपी अशावेळी न्यायालयात जामीनसाठी अर्ज करु शकतो. न्यायालयाला वाटेल तर आरोपीकडून पी.आर.बाँड घेवून सोडू शकतो. जमानतदार जामीन घेण्याकरीता आरोपीकडे उपलब्ध नसेल किंवा तो आरोपी गरीब असेल अशाप्रकारचा आरोपी स्वत: पी.आर.बाँडवर सोडण्याकरीता अर्ज करु शकतो. न्यायालय आरोपीला जेव्हा जमानतीवर सोडतो त्यावेळी आरोपीला अटी-शर्तीवर सोडले जाते. त्यामुळे प्रत्येक आरोपीने सुटल्यानंतर अटी-शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे. एखादा आरोपी कस्टडीत असेल, तो गरीब असेल, स्वखर्चाने वकील करु शकत नसेल तर अशावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे मोफत वकील दिला जातो असे सांगितले.
ॲड.मंगला बन्सोड म्हणाल्या की, जे आरोपी तुरुंगात आहेत व त्यांचेविषयी प्रकरण न्यायालयात सुरु आहे अशा वेळेस सदर गुन्ह्यात शिक्षेबद्दल तडजोड करण्यासाठी अर्ज दाखल करु शकतो. अशावेळी न्यायादर सदर प्रकरणात शासकीय अभियोक्ता किंवा फिर्यादी यांचे म्हणणे मागवू शकतो. जर आरोपीला शिक्षेचा किंवा दंडाचा प्रावधान असेल तर कबुली करुन न्यायालयाने आकारलेल्या दंडात विहीत कैद व द्रव्यदंड कमीजास्त भरण्याची विनंती करुन दंड भरुन सुटका करुन बाहेर पडता येवू शकते. आरोपीने सुटकेकरीता अर्ज दिला असेल व तो स्वेच्छेने दिला किंवा नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. हा अर्ज सुनावणीसाठी निश्चित केला जातो. आरोपीने केलेला गुन्हा हा त्याच्या आयुष्यातील पहिला गुन्हा असेल तर त्यांनी दिलेल्या अर्जावर झश्रशर इरीसरळपळपस केला जातो. फिर्यादी व आरोपी यांच्यात दाखल केलेले प्रकरण त्यामध्ये तडजोड करण्याकरीता फिर्यादी व आरोपी तयार असणे आवश्यक आहे. तक्रारदार व आरोपी यांचे म्हणणे ऐकल्यानंतर तडजोड केली जावू शकते असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार कारागृहाचे अधीक्षक ए.एम.कुंभरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...