अर्जुनी मोरगाव,दि.6- तालुक्यातील बुधेवाडा येथील शाळेत एका शिक्षकांने गुरु व शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याचे काम केल्याची घटना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी (दि.५) उघडकीस आली.दरम्यान या शिक्षकाला पोलीस तक्रारीनंतर अटक करण्यात आली असून जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी तातडीने शिक्षक गोपाल जनबंधू या शिक्षकाला आज (दि.६) निलंबीत केली आहे.
या घृणास्पद प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या शिक्षकावर अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून मंगळवारी रात्री त्याला अटक केली आहे. त्या आरोपी शिक्षकाचे नाव गोपाल निलकंठ जनबंधू (४८) आहे. तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुधेवाडा येथे सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहे. तो शाळेत कर्तव्यावर असताना लघूशंका व मध्यान्ह सुटीत सहकारी शिक्षक नसल्याची खात्री करुन कधी एक, कधी दोन तर कधी तीन विद्यार्थिनीना बोलवायचा. वर्ग खोलीच्या खिडक्या व दरवाजा बंद करुन विद्यार्थिनींच्या गुदगुद्या व अनेक अश्लील चाळे करीत असे. हा प्रकार मागील महिन्याभरापासून सुरु होता. शिक्षकाकडून होत असलेल्या लैगिंक अत्याचाराची माहिती विद्यार्थिनींच्या पालकांना कळताच त्यांनी मंगळवारला अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक संदीप वाटोळे व देवरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांनी बुधेवाडा येथे भेट दिली. आरोपी शिक्षकाविरुद्ध कलम ३७६ (२), (फ), (आय), (जे), ३५४ (अ) (१) (एक) भादंवि, सहकलम ३ (ब), ४, ७, ८, ९ (म), १० लैगिंक अपघरात बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलसिंह सूर्यवंशी तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment