Wednesday, 6 November 2019

मला त्रास देणाऱ्यांची नावं उघड करणार- एकनाथ खडसे


I will reveal the names of those who harass me - Eknath Khadse; Shirdi sightseeing | मला त्रास देणाऱ्यांची नावं उघड करणार; एकनाथ खडसेंनी खडसावले


शिर्डी.दि.06- माझेवर अनेक आरोप झाले. पण त्यात काही तथ्य आढळले नाही. दोष नसतानाही अनेकांनी त्रास दिला. तरीही आपण श्रद्धा आणि सबुरीचे धोरण ठेवले. लवकरच आपण आत्मचरित्र लिहणार असून त्यात त्रास देण्याऱ्यांची नावे उघड करण्यार असल्याचा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला.
खडसे यांनी बुधवारी सहकुटूंब साईदरबारी हजेरी लावली़. यावेळी संस्थानचे सीईओ दीपक मुगळीकर यांनी त्यांचा सत्कार केला़. यावेळी डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, माजी विश्वस्त सचिन तांबे आदींची उपस्थित होते़. खडसे पुढे म्हणाले, राज्यातील जनतेने महायुतीला निवडून दिले आहे़. दोन्ही पक्षातील तणाव काही दिवसात मिटेल. शेवटच्या क्षणाला महायुतीचेच सरकार येईल. राज्यात स्थीर व महायुतीचे सरकार यावे यासाठी यासाठी प्रार्थना केली आहे. युती करताना दोन्ही पक्षाचे काय ठरले ते माहीत नाही़. मुख्यमंत्री ठरविण्याएवढा मी मोठा नाही़. त्यामुळे माझ्यासारख्याला त्यावर प्रतिक्रिया देता येणार नाही़. निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे घोषित केले आहे़. त्यावर पक्षाध्यक्ष अमीत शहा यांनीही शिक्कामोर्तब केले आहे़. त्यामुळे आमच्या नजरेसमोर भाजपा व महायुतीचा नेता म्हणून फडणवीसच आहेत़.शिवसेना आक्रमक असताना भाजप शांत आहे. याचा अर्थ तो बॅकफुटवर आहे असा नाही़. पक्षाचा तो स्वभाव आहे़. तणाव न वाढवता मार्ग निघेल़. महायुती टिकविण्याच्या दृष्टीने भाजपाने भुमिका स्वीकारलेली दिसते़. तणाव संपून संवाद वाढावा व एकत्रिकरण व्हावे, त्या माध्यमातून चांगला निर्णय व्हावा अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली़. संघाने भाजपाला कधी आदेश दिल्याचे आठवत नाही. आजवर संघाने योग्य ते मार्गदर्शन केल आहे़. संघाने आताही सल्ला दिला असेल त्यांना तो अधिकार आहे.

धान खरेदी केंद्र त्वरीत सुरू करा- आमदार सहसराम कोरोटे


 गोंदिया,ता.05 - जिल्ह्यात अवकाळी पावसाने धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. परिणामी, शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. याशिवाय जिल्हात अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने शेतकरी दुहेरी संकाटात सापडला आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढून त्यांना धीर देण्यासाठी शासनाने जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्रे विनालंब सुरू करावे, अशी मागणी आमगाव विधानसभा क्षेत्राचे नवनियुक्त आमदार सहसराम कोरोटे यांनी काल मंगळवारी (दि.05) जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला दिलेल्या निवेदनातून केले आहे.
  निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात गोंदिया जिल्हा कांग्रेसचे अध्यक्ष पुरूषोत्तम बाबा कटरे, राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते नरेश माहेश्वरी, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्यासह महाआघाडीच्या इतर पक्ष पदाधिकारी यांचा समावेश होता. समावेश होता. जिल्हाधिकारी कांदबरी बलकवडे यांचेशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे त्वरीत करून तसा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे सांगितले. 

तिरोडाचे बीडीओ एसीबीच्या जाळ्यात


50 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

गोंदिया,दि.06- कंत्राटी अभियंत्याचे मानधनाचे देयक काढणे आणि सेवा नियमित करण्याची शिफारस करण्याच्या मोबदल्यात 2 लाखापैकी 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता लाच म्हणून स्विकारताना तिरोडा येथील गटविकास अधिकारी यांना त्यांच्या राहत्या घरातून लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज बुधवारी (दि.6) रंगेहाथ पकडले. सदर आरोपीवर गोंदियाच्या रामनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
त्या लाचखोर गटविकास अधिकाऱ्याचे नाव दिनेश ब्रिजलाल हरिणखेडे (वय 52) राहणार द्वारका नगर, जे. एम. पटेल हायस्कूलजवळ गोंदिया असे आहे.
प्रकरण असे की, तक्रारदार हे तिरोडा पंचायत समितीमध्ये बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून मानधनावर ग्रामीण गृह निर्माण अभियंता या पदावर  7 मार्च 2017 पासून कार्यरत होते. त्यांचा 30 ऑगस्ट 2019 ला सेवाकाल संपला होता. तक्रारदाराचे 1 एप्रिल ते 30 ऑगस्ट 2019 पर्यंत कामाचे अंदाजे 1 लाख रुपये पंचायत समितीकडे येणे होते. याशिवाय तक्रारदाराची सेवा पुढील 5 वर्षापर्यंत वाढविण्यासाठी बाह्ययंत्रणेकडे शिफारस करणे आवश्यक होते. या दोन्ही कामाचा मोबदला म्हणून आरोपीने तक्रारदाराकडे 2 लाख रुपये लाचेची मागणी केली.
मात्र, तक्रारदारास लाच देण्याचे नसल्याने त्याने 20 ऑक्टोबर रोजी गोंदियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून संबंधित विभागाने आज बुधवारी (दि.06) ला आरोपीच्या गोंदिया मुक्कामी राहत्या घरी सापळा लावला. यामध्ये आरोपीने लाचेचा पहिला हप्ता म्हणून 50 हजाराची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संबंधितावर स्थानिक रामनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.
सदर कारवाई अधीक्षक रश्मी नांदेडकर आणिअप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांचे मार्गदर्शनात उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, शिवशंकर तुंबडे, विजय खोब्रागडे, राजेश शेंद्रे, प्रदीप तुळसकर, रंजित बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, वंदना बिसेन, गीता खोब्रागडे, देवानंद मारबते यांनी पार पाडली.

06 to 12 nove 2019 berar times epaper





Tuesday, 5 November 2019

मुख्यमंत्री भाऊ, डबघाईस आलेल्या कुटुंबाला सावरण्याचं बळ द्या


"Chief Minister Bhai, strengthen the family to come to out of problem" | ''मुख्यमंत्री भाऊ, डबघाईस आलेल्या कुटुंबाला सावरण्याचं बळ द्या''
यवतमाळ: परतीच्या अवकाळी पावसाने शेतातील नेस्तनाबूत झालेले पीक पाहून चिंताग्रस्त तरुण मुलाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. एका मुलीच्या लग्नाकरिता उसनवार घेतलेले कर्ज कसे फेडायचे?, दुसऱ्या विवाहयोग्य मुलीचे लग्न कसे करायचे?, शेतीकरिता घेतलेले कर्ज कसे फेडायचे?, संसाराचा पुढील गाडा कसा पेलायचा? अशा नानाविध प्रश्नाने मनात काहुर माजलेले आहे. अशा कठीण प्रसंगी मुख्यमंत्री भाऊ, माझ्या डबघाईस आलेल्या कुटुंबाला सावरण्याचं बळ द्या, अशी आर्त साद मागील वर्षी मुंबई येथे जाऊन देवेंद्र फडणवीसांना राखी बांधणा-या एका मुस्लिम बहिणीने घातली आहे.
अकोला बाजार येथील शेतकरी विधवा महिला फरजानाबी हुसेनखाॅ पठाण ( 62) यांना आठ मुली असून, एक तरुण मुलगा होता. त्यापैकी सात मुलीचे लग्न झाले असून, एक मुलगी सध्या विवाहयोग्य आहे. मागील उन्हाळ्यात एका मुलीचे लग्न झाले. त्या लग्नाकरिता घेतलेले खासगी कर्ज, शेताकरिता घेतलेले पीककर्ज आता कशाने फेडायचे अशी चिंता त्यांचा मुलगा अरबाजखाॅ हुसेनखाॅ पठाण याला भेडसावत होती. तो 31 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सकाळी शेतात गेला, एवढ्या कष्टाने उभे केलेले पीक परतीच्या अवकाळी पावसाने हातातून गेलेले पाहून त्याला ह्रदयाघात झाला आणि त्यात त्याचे निधन झाले. यंदा त्याचेही लग्न करायचे ठरले होते. एकुलता एक होतकरू मुलगा मरण पावल्यामुळे फरजानाबीचे कुटुंब पोरके झाले आहे. अवकाळी पावसाने शेतातील पीकही गेले, तरुण होतकरू मुलगाही जग सोडून गेला, त्यामुळे पुढील आयुष्य जगायचे कसे, मुलीचे लग्न कसे करायचे, कर्ज कसे फेडायचे असे नानाविध प्रश्न भेडसावत असताना फरजानाबींना अशा संकटकाळी भाऊ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आठवण आली. माझ्या डबघाईस आलेल्या कुटुंबाला सावरण्याचं बळ द्या व माझ्या कुटुंबाचे रक्षण करा म्हणत फरजानाबींनी देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे आर्त साद घातली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यासंबंधी कर्जमाफीसारखे अनेक निर्णय घेतले. त्या निर्णयाची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता जिल्ह्यातील दहा शेतकरी महिलांनी मुंबई येथे वर्षा बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली होती. त्यामध्ये अकोला बाजार येथील रहिवासी फरजानाबी यांचा ही समावेश होता.

गॅसजोळणी सुरक्षा तपासणीच्या नावावर कंपनी करतेय ग्राहकांची लुबाडणूक-दिपकसिंह पवार




देवरी,दि.०५ः-अधिकृत गॅस वितरण कंपनीकडून पुरविण्यात येणारी गॅसची सुरक्षा नळीची गॅरंटी पाच वर्षांची असते. पण ती सुरक्षा नळी दोन वर्षाच्या आत खराब होत आहे. दुय्यम दर्जाच्या सुरक्षा नळीचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येऊ लागलेल्या आहेत. त्यातच गेल्या गॅस वितरण कंपनीकडून दर दोन वर्षांनी ग्राहकांच्या घरातील गॅस जोळणीची तपासणी(रेगुलर ग्राहक)करणे अनिवार्य असतांनाही कंपनीकडून तसे पाऊल आजपर्यंत उचलले गेले नव्हते. मात्र गेल्या तीन चार दिवसापासून देवरी तालुक्यात गॅस कंपनीकडून तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या तपासणी मोहीमेच्या वेळी ग्राहकाकंडून तपासणीच्या नावावर पैशाची मागणी होत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य दिपकसिंह पवार यांनी केला आहे. सोबतच उज्वला गॅस योजनेसह सध्या नव्याने सुरु झालेल्या काही योजनेतील ग्राहकांच्या सुरक्षानळीची व सिलिंडर कॉकची तपासणी ही ५ वर्षात करावयाची असते. परंतु सध्या त्यांच्याकडेही जाऊन तपासणीच्या नावावर पैशाची मागणी होत असल्याने गॅस कंपनीने याकडे लक्ष द्यावे असे पवार यांनी म्हटले आहे.

जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार- आ. सहसराम कोरोटे


देवरीत दीपावली मिलन उत्साहात

देवरी, दि.5 - मला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी बरेच प्रयत्न केले. परंतु, सततच्या जनसंपर्कामुळे मतदारांनी मला भरभरून आशीर्वाद दिले. कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून मला विधानसभेत धाडले. लोकांचा माझ्यावर विश्वास असल्याने मी आमदार झालो. आमगाव विधानसभा मतदार संघातील शेतकरी, कामगार, युवक, बेरोजगार, महिला आणि आबालवृद्धांच्या अधिकारासाठी मी संघर्षरत राहीन. मी कोणतेही आश्वासन देणार नाही. मात्र, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सामान्यांच्या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन आमगाव विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार यांनी देवरी येथे गेल्या रविवारी (दि.3) केले.
स्थानिक सीताराम लॉन्समध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने दीपावली मीलन कार्यक्रमात ते आपल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे हे होते. यावेळी ज्येष्ठ नेते टोलसिंह पवार, माजी मंत्री भरत बहेकार, राष्ट्रवादीचे नेते नरेश माहेश्वरी, शांतिलाल जैन, राजेश नंदागवळी, रत्नदीप दहिवले, महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, शेखर कनोजिया, राधेशाम बगडीया, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष छोटेलाल बिसने, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम,अ‍ॅड. प्रशांत संगीडवार, ओमराज बहेकार,दीपक पवार, देवरी तालुकाध्यक्ष संदीप भाटिया, माधुरी कुंभरे, सीमा कोरोटे, पारबता चांदेवार, प्रल्हाद भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार कोरोटे म्हणाले की, विधानसभेची निवडणूक जिंकल्याने सर्वकाही साध्य झाले असे समजण्याचे काही कारण नाही. मेहनत ही करावीच लागणार आहे. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. इच्छुकांनी आतापासून जनतेच्या संपर्कात राहून त्यांचे सुखदुःख समजून घेत त्यांची कामे केली पाहिजे.अशाच लोकांचा पक्ष सुद्धा विचार करेल. काँग्रेस पक्षात प्रभावाने तिकिटे मिळण्याचे दिवस गेले. हे माझ्या उमेदवारीने कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे नरेश माहेश्वरी म्हणाले की, आघाडीचा विजय हा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे. लढण्याची जिद्द कायम असली पाहिजे. सध्या देशातील वातावरणामुळे आमच्या कार्यकर्त्यांचे अनेक ठिकाणी प्रयत्न कमी पडले. मात्र, जनतेने आघाडीचे दिवस चांगले असल्याचे या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी आपापसांत संघर्ष न करता एकजुटीने कार्य केल्यास आपल्याला चांगले दिवस बघावयास नक्की मिळतील, अशा आशावाद व्यक्त करीत आघाडी धर्माचे पालन अगदी ग्रामपंचायत स्तरावर कायम ठेवण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. भंडारा जि.प.चे माजी अध्यक्ष टोलसिंह पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांनी इतिहासापासून धडा घेतला पाहिजे. पक्षातील एका माजी आमदारामुळेच सहसराम कोरोटे सारखा दमदार आमदार या मतदार संघाला मिळाला. संघटन शक्ती ही कोणत्याही पक्षाच्या यशासाठी कारणीभूत असते. दुर्दैवाने त्या नेत्याला ते अद्यापही उमगले नाही. अहंकारामुळे त्या नेत्याने आपला घात केला, हे या निकालाने दाखवून दिले आहे. या मतदार संघात आतापर्यंत केवळ तीन आमदार झाले.कोणीही परत आमदार होऊ शकले नाही. त्यामुळे माजी आमदार महादेवराव शिवणकर यांच्या इतिहासाची पुनरावृत्ती करावयाची असेल तर कोरोटे यांनी जनतेत मिसळण्याची कला आत्मसात केली पाहिजे. जनतेला विसरणारा नेता विजयाची पुनरावृत्ती करू शकत नाही. श्री बहेकार यांनी बोलताना  सांगितले की, जिल्ह्यात मृतप्राय झालेली काँग्रेस ही आमदार कोरोटे यांच्या विजयाने पुनर्जिवीत झाली आहे. आमच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास या निवडणुकीपूर्वी बराच कमी झाला होता. असे नसते तर निकाल यापेक्षा अधिक चांगले आले असते. काँग्रेसला संपवू पाहणाèयांना जनतेने इशारा दिला आहे. दरम्यान, पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित आमदार कोरोटे यांचा सत्कार यावेळी मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचलन अविनाश टेंभरे यांनी केले.उपस्थितांचे आभार माजी पंचायत समिती सभापती वसंत पुराम यांनी केले. या कार्यक्रमाला देवरी, आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...