गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.20ः-अहमदनगर शहरातील तोफखाना भागातील दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणार्या नराधमास व त्याला पाठीशी घालणार्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सिरोंचा, चामोर्शी व एटापल्ली येथील पद्मशाली समाज संघटनेच्यावतीने तहसीलदारामार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.सिरोंचा येथील तहसिलदारांना निवेदन देताना अध्यक्ष श्रीनिवास रच्चावार,ओमप्रकाश गादेवार,श्रीनीवार अंकम,कृष्णमृर्ती रच्चावार,सम्मया अंकम,सरयम चिलकामारी,आनंद रच्चावार,लक्ष्मण पेराला,गट्टू पोरन्ला उपस्थित होते.
चामोर्शी येथे निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष मांतेश श्रीरामे, बंडूजी श्रीरामे, सुनिल बोधनवार, नरेश अलसावार, संतोष गोटमुकुलवार, मलय्या मेनेवार, दामोधर गुतकोंडावार, वसंत यनगंधलवार, गजानन कोंडलेकर, संतोष बोधनवार, मनिषा बोधनवार, सोनम कोंडावार, योगीता श्रीरामे, शोभा गुंटूकवार, माधुरी बर्लावार, मुर्लीधर अलसावार यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. तर एटापल्ली येथे निवेदन देताना श्री मार्कंडेय पद्मशाली समाज बहुउद्देशिय संस्थेच्या सचिव गिता दासरवार, अध्यक्षा सुशिला रच्चावार व समाजबांधव उपस्थित होते.

No comments:
Post a Comment