Tuesday, 25 September 2018

सालेकसात चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद


सालेकसा,दि.24(पराग कटरे)ः- टेक-विस्डम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सालेकसाच्यावतीने सामाजिक आणि ज्वलंत विषयावर चित्र प्रदर्शनीचे आयोजन रविवार(दि.23)ला करण्यात आले होते. ह्या चित्र प्रदर्शनात *महाराष्ट्र नवनिर्माण सेना सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बाळासाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे,एम.एफ. हुसेन,अमृता शेरगिल, रवींद्रनाथ ठाकूर ह्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना चित्रकलेचे महत्व पटवून दिले.चित्रकार हा समाजाचा आरसा असतो असे स्पष्ट करीत चित्रकारितेचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वीरेंद्र उईके होते.उदघाटन नगरपंचायत सभापती उमेदलाल जैतवार यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून सालेकसा काँग्रेस कमिटी अध्यक्ष वासुदेव चुटे,आई फाउंडेशन सालेकसा संचालक शैलेश बहेकार, गोटूल आदिवासी बहू. संस्थाचे सौ. वंदनाताई मेश्राम, ममता व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक चेकलाल तांडेकर,प्राध्यापक राकेश रोकडे, गौरव पांडे मंचावर उपस्थित होते. तसेच तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येत प्रदर्शनी बघण्यास उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...