Wednesday, 12 September 2018

चिचगडच्या पोलीस क्वार्टरला लागली आग

चिचगड,दि.13 : येथील पोलीस ठाण्यामागे असलेल्या पोलीस क्वार्टरमधील रहिवासी पोलीस कर्मचारी विष्णू राठोड यांच्या क्वार्टरला (घराला) मंगळवारी दुपारी २ वाजतादरम्यान आग लागली. या आगीत त्यांच्या घरातील सामानाची चांगलीच नासधूस झाली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याने नुकसान वाढले नाही.
चिचगड पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुमारे १० घरांची चाळ आहे. यातीलच गणूटोला एओपीमध्ये कार्यरत विष्णू राठोड यांच्या घराला मंगळवारी (दि.११) दुपारी २ वाजतादरम्यान आग लागली. चिचगड पोलीस ठाण्यात कार्यरत मनिषा राठोड या त्यांच्या पत्नी यावेळी घरी होत्या. त्यांना आग दिसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात कळविले व ठाणेदार नागेश भास्कर यांनी लगेच देवरी नगर पंचायतमधील अग्निशामक बोलाविले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले स्वत: घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या मदतीने लगेच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र तरिही राठोड यांच्या घरातील सामानाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. शॉटसर्कीटने ही आग लागल्याचा अंदाज वतर्विला जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...