Thursday, 20 September 2018

पोलीस अधिक्षकांच्या हस्ते गुणवत्ताप्राप्त व सेवानवृत्त पोलिस कर्मचार्‍यांचा सत्कार

गोंदिया,दि.20ः-पोलिस कर्मचार्‍यांच्या आर्थिक अडा-अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने स्थापित करण्यात आलेल्या सन २0१७-१८ पोलिस कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा १८ सप्टेंबर रोजी प्रेरणा सभागृह ,पोलिस आयुक्तालय कारंजा येथे थाटात पार पडली. सभेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व पोलिस दलातून सेवानवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला.
सभेत राखीव पोलिस निरीक्षक कमलाकर पाटेकर,पोलिस पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीराम मिर्शा, उपाध्यक्ष विनोद कल्लो, सचिव मिल्कीराम पटले, खजिनदार शाहीद अंसारी, संचालक वामन थाटकर, ईश्‍वरदास पुरी, संचालक श्रीधर शहारे वरिष्ठ लिपिक भुमेश्‍वरी मुरकुटे, प्रतिभा चव्हाण,सुभाष राऊत महिला पालीस शिपाई शशीकला उके आदी उपस्थित होते. सभेत पतसंस्थेचे संचालक मंडळाच्या वतीने गोंदियाचे पोलिस अधिक्षक हरीश बैजल यांचे शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. पोलिस कर्मचारी सहकारी पतसंस्थेची स्थापना १८ मार्च २00९मध्ये झाली होती. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पतसंस्थे विषयी पोलिसांच्या समस्येचे निराकरण करण्याकरिता ९वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी पोलिस अधिक्षक बैजल यांच्या हस्ते पतसंस्थेत नव्याने सभासद कर्मचार्‍याच्या गुणवत्ता प्राप्त एकूण २३ पोलिस पाल्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार म्हणून शिष्यवृत्ती,स्मृतिचिन्ह व गुलाबाचे फुल तसेच माहे जानेवारी २0१८ मध्ये गोंदिया जिल्हा पोलिस दलातून सेवानवृत्त झालेल्या १४ सभासद कर्मचार्‍यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ब्लँकेट देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बैजल यांनी पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीसाठी नियमित वसुलीच्या कार्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,कोषाध्यक्ष व कार्यालयाचे लेखाशाखेतील मंत्रालयीन स्टॉफचे बहुमोलाची भूमिका आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन नापोशि राज वैद्य यांनी केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...