Tuesday 25 September 2018

सामाजिक न्यायमंत्र्यांच्या घराला घेराव


सडक अर्जुनी दि.२५ः: राज्यभर गणेश विसर्जनाचा उत्साह असताना गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे मात्र वेगळ्याच कारणाने वातावरण तापले होते. शिवगणेश मंडळाचे प्रमुख शेषराव गिऱ्हेपुंडे यांना पोलिसांनी हद्दपार केल्याने दि. (२३) रोजी चक्क महिलांनी गिऱ्हेपुंजे यांना यांना हद्दपार केल्याने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या घराला घेराव घातला.सविस्तर असे की, ब्रिटिशांच्या काळात सडक-अर्जुनी येथे जातीय दंगल घडली होती. परंतु स्वातंत्र्यानंतर सडक अर्जुनी येथे मागील ३३ वर्षांपासून शिव गणेश मंडळ गणेश स्थापना करीत आहे. या गावात दिवाळी व ईद हे दोन्ही सण हिंदू-मुस्लीम समाजबांधव एकोप्याने साजरा करतात. परंतु या परंपरेला छेद लावण्याचे काम पोलीस करीत असल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सडक-अर्जुनी या गावाने विशेष शांतता पुरस्कार पटकाविला. त्यांचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला होता. दरवर्षी गणेशोत्सवात शांतता कमिटीच्या बैठकीत हिंदू-मुस्लीम यांच्या बैठका घेतल्या जातात. यंदाही आतापर्यंत सहा बैठका घेण्यात आल्या. या सहा बैठकांमध्येही सर्व धर्माच्या लोकांनी सण शांततेत साजरा होईल असे सांगितले. परंतु डुग्गीपारचे ठाणेदार यांनी ९ सप्टेंबर २०१८ रोजी जा.क्र. २२८६/२०१८ च्या पत्रान्वये अचानक १४ सप्टेंबर २०१८ ला देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मला गणपती विसर्जन मिरवणुकीत भाग घेऊ नका असे पत्र काढले. तेव्हा सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या निषेधार्ध मंडळाच्या महिलांनी राजकुमार बडोले यांचे घर आणि पोलीस ठाणे, अशा २ ठिकाणी मोर्चा काढत घेराव घातला. तथा कोणतीही विपरीत घटना घडू नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मात्र, यादरम्यान एकही विपरीत घटना घडली नाही..

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...