लाखनी, दि. ०७ : राष्ट्रीय शिक्षण संस्था तथा विवेकानंद सार्वजनिक वाचनालय लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने दिग्विजय दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या विश्वधर्म सभेतील ऐतिहासिक दिनाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 11 सप्टेंबर रोजी दिग्विजय दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त लाखनी येथील स्वागत सभागृहात दुपारी 4 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रतिभा राजहंस राहणार असून उद्घाटन गडचिरोली येथील प्रसिद्ध व्याख्याते पद्मश्री डॉ.राणी बंग करतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, वाचनालयाचे अध्यक्ष छबीलाल रहांगडाले, कार्यवाह अजिंक्य भांडारकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment