Wednesday, 26 September 2018

सुवर्णकन्येचे बेला येथे स्वागत


भंडारा,दि.26 : जिल्ह्याची कन्या आणि बेला येथील रहिवासी मयुरी धनराज लुटे हिने दिल्लीत पार पडलेल्या एशियाई स्पर्धेत ट्रॅक सायकलींगमध्ये दोन सुवर्ण पदक पटकाविले. सोमवारी सायंकाळी तिचे बेला गावात आगमन होताच गावकऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील बेला येथील मयुरी लुटे सहभागी झाली होती. शहरी स्पर्धकांना मागे टाकत तिने या स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकाविले. सोमवारी दिल्लीहून नागपूरला विमानाने आणि तिथून ती एका वाहनाने बेला येथे दाखल झाली. आपल्या गावच्या सुवर्णकन्येचे स्वागत करण्यासाठी बेला गावकरी सज्ज होते. जिल्हा परिषद शाळेजवळ मयुरी पोहचताच ढोलताशाच्या गजरात तिचे जल्लोषात स्वागत करुन गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सरपंच पुजा ठवकर, गणेश ठवकर, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, यशवंत सोनकुसरे उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता निमजे व शिक्षकांनी तिचे स्वागत केले. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, सरपंच पुजा ठवकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, धनराज साठवणे, प्रविण उदापुरे, जयश्री बोरकर, पांडुरंग खाटीक, ललीत बेंदरे, विश्वजित घरडे, दर्शन जोन्दे, संजु मते, उपसरपंच मंगला पुडके यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मयुरी लुटे, सुनिता लुटे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार उमेश मोहतुरे यांनी मानले. मयुरीने मिळविलेल्या या यशाने सर्व गावकºयांची मान उंचाविली होती.

लोकप्रिय़ साप्ताहिक बेरार टाईम्सचा 26 सप्टेंबर ते 2 आक्टोंबर अंक व न्युजपोर्टल करीता क्लिक करा-berartimes.com





Tuesday, 25 September 2018

सालेकसात चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद


सालेकसा,दि.24(पराग कटरे)ः- टेक-विस्डम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सालेकसाच्यावतीने सामाजिक आणि ज्वलंत विषयावर चित्र प्रदर्शनीचे आयोजन रविवार(दि.23)ला करण्यात आले होते. ह्या चित्र प्रदर्शनात *महाराष्ट्र नवनिर्माण सेना सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बाळासाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे,एम.एफ. हुसेन,अमृता शेरगिल, रवींद्रनाथ ठाकूर ह्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना चित्रकलेचे महत्व पटवून दिले.चित्रकार हा समाजाचा आरसा असतो असे स्पष्ट करीत चित्रकारितेचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वीरेंद्र उईके होते.उदघाटन नगरपंचायत सभापती उमेदलाल जैतवार यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून सालेकसा काँग्रेस कमिटी अध्यक्ष वासुदेव चुटे,आई फाउंडेशन सालेकसा संचालक शैलेश बहेकार, गोटूल आदिवासी बहू. संस्थाचे सौ. वंदनाताई मेश्राम, ममता व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक चेकलाल तांडेकर,प्राध्यापक राकेश रोकडे, गौरव पांडे मंचावर उपस्थित होते. तसेच तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येत प्रदर्शनी बघण्यास उपस्थित होते.

सामाजिक न्यायमंत्र्यांच्या घराला घेराव


सडक अर्जुनी दि.२५ः: राज्यभर गणेश विसर्जनाचा उत्साह असताना गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे मात्र वेगळ्याच कारणाने वातावरण तापले होते. शिवगणेश मंडळाचे प्रमुख शेषराव गिऱ्हेपुंडे यांना पोलिसांनी हद्दपार केल्याने दि. (२३) रोजी चक्क महिलांनी गिऱ्हेपुंजे यांना यांना हद्दपार केल्याने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या घराला घेराव घातला.सविस्तर असे की, ब्रिटिशांच्या काळात सडक-अर्जुनी येथे जातीय दंगल घडली होती. परंतु स्वातंत्र्यानंतर सडक अर्जुनी येथे मागील ३३ वर्षांपासून शिव गणेश मंडळ गणेश स्थापना करीत आहे. या गावात दिवाळी व ईद हे दोन्ही सण हिंदू-मुस्लीम समाजबांधव एकोप्याने साजरा करतात. परंतु या परंपरेला छेद लावण्याचे काम पोलीस करीत असल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सडक-अर्जुनी या गावाने विशेष शांतता पुरस्कार पटकाविला. त्यांचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला होता. दरवर्षी गणेशोत्सवात शांतता कमिटीच्या बैठकीत हिंदू-मुस्लीम यांच्या बैठका घेतल्या जातात. यंदाही आतापर्यंत सहा बैठका घेण्यात आल्या. या सहा बैठकांमध्येही सर्व धर्माच्या लोकांनी सण शांततेत साजरा होईल असे सांगितले. परंतु डुग्गीपारचे ठाणेदार यांनी ९ सप्टेंबर २०१८ रोजी जा.क्र. २२८६/२०१८ च्या पत्रान्वये अचानक १४ सप्टेंबर २०१८ ला देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मला गणपती विसर्जन मिरवणुकीत भाग घेऊ नका असे पत्र काढले. तेव्हा सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या निषेधार्ध मंडळाच्या महिलांनी राजकुमार बडोले यांचे घर आणि पोलीस ठाणे, अशा २ ठिकाणी मोर्चा काढत घेराव घातला. तथा कोणतीही विपरीत घटना घडू नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मात्र, यादरम्यान एकही विपरीत घटना घडली नाही..

तपासणी नाक्यावर वाहन चालकांची दिशाभूल


देवरी दि.२५ः: महाराष्ट्र सीमेवरील शिरपूर येथील चेक पोस्टवर सद्भाव कंपनीतर्फे वजन काट्यात बिघाड करुन अंडरलोड ट्रकला ओव्हरलोड दाखवून वाहन चालकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्याने सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तर अंडरलोड ट्रक ओव्हरलोड झाला कसा झाला असा संतप्त सवाल ट्रक मालक मनजीतसिंग भाटीया यांनी केला. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन कंपनीच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक सीजी ०४- व्ही ९९२२ देवरीकडून रायपूरकडे जात असताना ट्रक मालकांने देवरी येथे ट्रकचे वजन केले असता ट्रक अंडरलोड ४४००० किलो इतके होते.
सिरपूर येथील सदभाव कंपनीने या ट्रकचे पहिल्यांदा वजन केले असता वजन ४४२२० किलो इतके भरले. नियमानुसार १२० किलो वजन जास्त असल्याचे निदर्शनात आले. परंतु ट्रक मालकाने वजन काट्यावर आक्षेप घेत पुन्हा दुसºया काट्यावर वजन करायला लावले असता ४४००० इतके भरले.
यानुसार कंपनीच्या वजन काट्यात काहीतरी गडबड असल्याचे ट्रक मालकाच्या लक्षात आले. यावर त्यांनी आक्षेप घेत पत्रकारांना बोलावून या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली.
याबाबत येथे कार्यरत बीसीपी मॅनेजर पंकज त्रिपाठी यांना विचारले असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे वजन काट्याच्या बिघाडाचा भुर्दंड हा वाहन मालकांवर बसत असून ट्रक ओव्हरलोड आढळल्यास १५ ते २० हजार रुपयाचा दंड ट्रक मालकास भरावा लागतो. तेव्हा इथून ट्रक सोडले जाते.
परंतु शासनाने भारक्षमता निर्धारित केल्यापासून कुणीही ओव्हरलोड माल भरत नाही. शिरपूर येथील सदभाव कंपनी अंडरलोड ट्रकला ओव्हरलोड दाखवून ट्रक मालकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मनजीतसिंग भाटीया यांनी केला आहे.
यापूर्वी सुध्दा असा प्रकार ट्रान्सपोर्टर संघटनेने निदर्शनास आणून दिला होता. तसेच याची परिवहन आयुक्त मुंबई यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु यावर कोणतीच कारवाई कंपनीवर झाली नसल्याने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे. सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असणारे मोटर वाहन निरीक्षक (आरटीओ)अधिकारी मात्र पूर्णपणे हतबल झाले असून त्यांना कुठलेच अधिकार नसल्याची बाब पुढे आली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी परिवहन आयुक्तांना केलेल्या तक्रारीतून ट्रक मालक मनजीतसिंग भाटीया यांनी केली आहे.

Monday, 24 September 2018

ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी येथे गोवर रुबेल्ला वर कार्यशाळा संपन्न

देवरी: 22 ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी येथे चौथ्या पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर पालकसभेत प्राचार्य डॉ.सुजित टेटे सह सर्व शिक्षक उपस्थित होते.
प्रामुख्याने पालकसभेमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती, सहशालेय उपक्रम तसेच गोवर रुबेल्ला लसीकरण या विषयाची जनजागृती करण्यासाठी प्रमुख उद्देश ठेवण्यात आले होते.
शालेय विषयावर शिक्षक आणि प्राचार्यांनी पालकांशी चर्चा केली.
रुबेल्ला विषयी सविस्तर माहिती डॉ. देवकुमार राऊत (नांदेळ) यांनी मार्गदर्शन केला.सभेचे सूत्रसंचालन  विश्वाप्रित निकोडे यांनी केला. पालकांनी सदर सभेत उपस्थिती दर्शवून सहकार्य केला.

न्यू सीता पब्लिक स्कूल येथे गोवर रुबेला वर कार्यशाळा संपन्न*


देवरी दि २२ : येथिल नामांकीत सीबीएसई संलग्न न्यू सीता पब्लिक स्कूल येथे मासिक पालक सभे अंतर्गत गोवर रुबेला लसीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळा प्राचार्य रवी खरवडे, शाळा व्यवस्थापन समिती सल्लागार सदस्य श्रीमती राझिया बेग, पालक प्रतिनिधी श्री जितेंद्र धरमसहारे,पालक वर्ग व शिक्षक उपस्थित होते.  यावेळी गोवर व रुबेला ची कारणे ,  लक्षणे व परिणाम याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. पालक वर्गाकडून उपस्थित शंकाचे प्राचार्य खरवडे यानी निरसन केले व या लसीकरण मोहिमेस १०० टक्के यशस्वी करण्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पालक सभेंतर्गत सीबीएसई अभ्यासक्रम नुसार होणाऱ्या परीक्षा पॅटर्न बदलाबाबद व त्यानुसार विध्यार्थ्यांचि तयारी या बद्दल सुध्दा चर्चा करण्यात आली.या कार्यशाळेचे संचालन हरीश उके यांनी तर  श्रीमती प्रियांका लाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Thursday, 20 September 2018

आश्रमशाळेतील गैरप्रकाराची चौकशी करा; जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांची मागणी

जिल्ह्यात १७ शासकीय, २८ अनुदानित आश्रमशाळा, दहा वसतिगृह आहे. या आश्रमशाळेत 6 ते १८ वर्षे वयोगटातील मुली शिक्षण घेत आहेत. मुलींसाठी स्त्री अधीक्षिका, तर मुलांसाठी पुरुष अधीक्षकपद आहे. मात्र, सोनुर्ली येथील शासकीय आश्रमशाळेत नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींचा लैंगिक छळ  झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच जांब येथील आश्रमशाळेतही मुलींचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार  उघडकीस आला आहे. यामुळे मुलगी गरोदर असल्याचीही माहिती आहे. या दोन्ही घटना आदिवासी समाजातील गोरगरीब मुलींसोबत घडल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे मुलींमध्ये भीतीच वातावरण आहे. त्यामुळे मुली सध्या शाळेत येत नाहीत.

BERAR TIMES: कोसबीच्या जंगलात पोलीस नक्षल्यात चकमक,साहित्य जप्त...

BERAR TIMES: कोसबीच्या जंगलात पोलीस नक्षल्यात चकमक,साहित्य जप्त...: जोब-कोसबी जंगलात पोलिस-नक्षल चकमक गोंदिया, दि. २० : देवरी- चिचगडच्या मध्यंतरी असलेल्या मरामजोब-कोसबीजवळच्या घनदाट जंगलात पोलिस- नक्षल चकम...

BERAR TIMES: गंगाझरी पोलीसांनी बैरागीटोल्यातील दारुभट्या केल्या...

BERAR TIMES: गंगाझरी पोलीसांनी बैरागीटोल्यातील दारुभट्या केल्या...: गोंदिया,दि.२०ः- गोंदिया जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन आणि नियंत्रणाच्या दृष्टीने पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी दिलेल्या सुचनां...

गंगाझरी पोलीसांनी बैरागीटोल्यातील दारुभट्या केल्या उध्वस्त

गोंदिया,दि.२०ः- गोंदिया जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन आणि नियंत्रणाच्या दृष्टीने पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करीत जिल्ह्यातील सर्वच पोलीस निरिक्षकांनी आपपल्या ठाण्यातील अवैध धंदे,दारुव्यवसाय व अवैध दारुभट्यांचा बंदोबस्त करण्यास सुरवात केली आहे.या मोहिमेंतर्गतच गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गंत येत असलेŸल्या बैरागीटोला परिसरातील अवैधरित्या मोहफुलाची दारु तयार करणाèया भट्यांतील साहित्य जप्त करुन उध्वस्त करण्याची कारवाई सहाय्यक पोलीस निरिक्षक शितल जाधव यांच्या नेतृत्वातील पथकाने आज(दि.२०)केले.खर्रा ग्रामपंचायतर्गंत येत असलेल्या बैरागीटोला गावातून चार पाचगावामध्ये अवैधरित्या दारुपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती मिळताच जंगलात मोहफुलाची दारु तयार करण्यात येत असलेल्या ५ ते ६ भट्या नष्ट करण्यात आल्या.तसेच साहित्यही जप्त करण्यात आले.या कारवाईत ३ हजार लीटर सडवा मोहफुल नष्ट करण्यात आला.तसेच दारु बनविण्यासाठी वापरण्यात येणारे ६० हजार किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.सोबतच तीन आरोपंीना घटनास्थळावरुन अटक करण्यात आल्याने गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायिकामध्ये चांगलीच धास्ती निर्माण होऊ लागली आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरिक्षक शितल जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस उनिरिक्षक सोनवाने,पोलीस नायक मुकेश शेंडे,पोलिस शिपाई अजय चौरे,विक्की धांडे,सुशील गजभिये,चालक बघेल व होमगार्ड नागपूरे यांच्या पथकाने केली.

BERAR TIMES: ट्रकची ऑटो रिक्षाला धडक, 3 चिमुकल्यांसह पाच जणांचा...

BERAR TIMES: ट्रकची ऑटो रिक्षाला धडक, 3 चिमुकल्यांसह पाच जणांचा...: नागपूर,दि.10 : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर-सावनेर मार्गावर वरोडा शिवारात भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात...

BERAR TIMES: मोटारसायकल अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी

BERAR TIMES: मोटारसायकल अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी: ब्रम्हपुरी,दि.20ः- वडसा-ब्रह्मपुरी मार्गावरील विद्यानिकेतन सीबीएससी शाळेजवळ आज (दि.20) सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास झालेल्या मोटारसायकलच्...

मोटारसायकल अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी

ब्रम्हपुरी,दि.20ः- वडसा-ब्रह्मपुरी मार्गावरील विद्यानिकेतन सीबीएससी शाळेजवळ आज (दि.20) सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास झालेल्या मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलस्वार पतीचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाल्याची घटना घडली.
येथील ने.हि.महाविद्यालयात कार्यरत अशोक विठोबा चहांदे(53) हे हिरो होंडा क्र. एम.एच.34 एडी 0495 ने वडसाकडून ब्रम्हपुरीकडे येत असताना विद्यानिकेतन शाळेजवळ वाहनासमोर अचानक डुक्कर येऊन दुचाकीला धडकल्याने मोटारसायकलचालकाचे संतुलन बिघडले.यात चाहांदे यांना जबर दुखापत झाली तर पत्नीला किरकोळ दुखापत झाल्याने ख्रिस्तानंद हास्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान चहादेंचा मृत्यू झाला. पत्निवर आवश्यक उपचार करून सुटी देण्यात आली.अशोक चहांदे यांचे मागे 4 मुली एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे.

ट्रकची ऑटो रिक्षाला धडक, 3 चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू

नागपूर,दि.10 : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर-सावनेर मार्गावर वरोडा शिवारात भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ऑटोतील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतात तीन लहान मुले, एक महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. 

मोहरम निमित्त नागपुरातील ताजबाग परिसरातील काही भाविक वरोडा शिवारातील चाँदशाह दग्र्याकडे ऑटोने जात होते. कळमेश्वर-सावनेर मार्गाववर वरोडा शिवारातील पोल्ट्री फार्मजवळ सावनेरकडून कळमेश्वरकडे जाणाऱ्या या भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिली. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पाचही मृतकांचे मृतदेह कळमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी सध्या तणावाचे वातावरण आहे. काहींच्या मते मृतक हे नागपुरातील राहणारे आहेत. तर काहींच्या मते ते हैदराबाद येथील रहिवासी असल्याचे जखमींपैकी एकाने सांगितले. नागपुरातील नातेवाईकाकडे ते पाहुणे म्हणून आले होते. 

BERAR TIMES: कोसबीच्या जंगलात पोलीस नक्षल्यात चकमक सुरु

BERAR TIMES: कोसबीच्या जंगलात पोलीस नक्षल्यात चकमक सुरु: गोंदिया,दि.20 -जिल्ह्यातील देवरी व कोरची तालुक्याला लागून असलेल्या कोसबीच्या जंगलात आज सकाळी  9 वाजेच्या सुमारास शोधमोहिमेदरम्यान पोलीस व ...

कोसबीच्या जंगलात पोलीस नक्षल्यात चकमक,साहित्य जप्त


BERAR TIMES: ग्रंथालयांच्या समस्यांना घेऊन ग्रंथालय संघाचे धरणे...

BERAR TIMES: ग्रंथालयांच्या समस्यांना घेऊन ग्रंथालय संघाचे धरणे...: गोंदिया,दि.20ः- राज्य शासनाच्या 'गाव तिथे ग्रंथालय' या योजनेला खीळ बसली आहे. वाढत्या महागाईमुळे तटपुंज्या मानधनात ग्रंथपालांना जी...

BERAR TIMES: पद्मशाली समाजाचे तहसीलदारांना निवेदन

BERAR TIMES: पद्मशाली समाजाचे तहसीलदारांना निवेदन: गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.20ः- अहमदनगर शहरातील तोफखाना भागातील दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास व त्याला पाठीशी घालणार्‍यांन...

BERAR TIMES: पेसा कायद्याची काढलेली अधिसुचना रद्द करा-नाना पटोल...

BERAR TIMES: पेसा कायद्याची काढलेली अधिसुचना रद्द करा-नाना पटोल...: गडचिरोली,दि.20ः- जिल्ह्यातील गैरआदिवासी व आदिवासींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे. आरक्षण कमी करून ओबीसींना जिल्ह्याच्या ...

BERAR TIMES: ग्रंथालयांच्या समस्यांना घेऊन ग्रंथालय संघाचे धरणे...

BERAR TIMES: ग्रंथालयांच्या समस्यांना घेऊन ग्रंथालय संघाचे धरणे...: गोंदिया,दि.20ः- राज्य शासनाच्या 'गाव तिथे ग्रंथालय' या योजनेला खीळ बसली आहे. वाढत्या महागाईमुळे तटपुंज्या मानधनात ग्रंथपालांना जी...

पद्मशाली समाजाचे तहसीलदारांना निवेदन

गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.20ः-अहमदनगर शहरातील तोफखाना भागातील दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास व त्याला पाठीशी घालणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सिरोंचा, चामोर्शी व एटापल्ली येथील पद्मशाली समाज संघटनेच्यावतीने तहसीलदारामार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.सिरोंचा येथील तहसिलदारांना निवेदन देताना अध्यक्ष श्रीनिवास रच्चावार,ओमप्रकाश गादेवार,श्रीनीवार अंकम,कृष्णमृर्ती रच्चावार,सम्मया अंकम,सरयम चिलकामारी,आनंद रच्चावार,लक्ष्मण पेराला,गट्टू पोरन्ला उपस्थित होते.
चामोर्शी येथे निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष मांतेश श्रीरामे, बंडूजी श्रीरामे, सुनिल बोधनवार, नरेश अलसावार, संतोष गोटमुकुलवार, मलय्या मेनेवार, दामोधर गुतकोंडावार, वसंत यनगंधलवार, गजानन कोंडलेकर, संतोष बोधनवार, मनिषा बोधनवार, सोनम कोंडावार, योगीता श्रीरामे, शोभा गुंटूकवार, माधुरी बर्लावार, मुर्लीधर अलसावार यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. तर एटापल्ली येथे निवेदन देताना श्री मार्कंडेय पद्मशाली समाज बहुउद्देशिय संस्थेच्या सचिव गिता दासरवार, अध्यक्षा सुशिला रच्चावार व समाजबांधव उपस्थित होते.

पेसा कायद्याची काढलेली अधिसुचना रद्द करा-नाना पटोले

गडचिरोली,दि.20ः-जिल्ह्यातील गैरआदिवासी व आदिवासींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे. आरक्षण कमी करून ओबीसींना जिल्ह्याच्या पदभरतीतून बाद केले आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. राज्यपालांनी पेसा कायद्याची काढलेली अधिसूचना रद्द करून भौगोलिक परिस्थितीवर निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन माजी खासदार तथा अखिल भारतीय शेतकरी, शेतमजूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
येथील इंदिरा गांधी चौकातील सभागृहात आयोजित भव्य धरणे आंदोलन सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, माजी आमदार आनंदराव गेडाम, निरीक्षक सुरेश भोयर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, जि.प. सदस्य अँड. राम मेर्शाम, डॉ. नामदेव किरसान, महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, जेसामल मोटवाणी, नगरसेवक सतीश विधाते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना नाना पटोले पुढे म्हणाले, जिल्ह्यात सुरजागड येथे लोहप्रकल्प लवकर सुरू करण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्या आहेत. या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी भाजप सरकारने 'लायड मेटल' कंपनीला कोनसरीजवळ फुकटात ६३ हेक्टर जमिन दिली. ४३ किलोमीटरवर त्यांना पोलिस संरक्षण दिले जाणार आहे. एकीकडे आदिवासी शेतकरी अतिक्रमण केल्यास त्यांना हटविले जाते. मात्र, लायडवर सरकार मेहरबान आहे. लायड मेटल कंपनीचा मालक हा सरकारचा जावई आहे का, असा संतप्त सवाल करीत राफेल विमान खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मात्र मोदी सरकार मान्य करायला तयार नाही. केवळ आश्‍वासने देऊन गोरगरिबांच्या पैशावर पंतप्रधान विदेश दौरे करून मज्जा मारत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. मोदी सरकार हे बहुजनांना नष्ट करायला निघाले असून ऑनलाईनच्या नावावर गरीब शेतकर्‍यांना वेठीस धरत आहे. कोणत्याही प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रक्रिया पार पाडावी लागत आहे. यातून मिळणारा महसूल हा खासगी कंपनीच्या घशात जात आहे. या कंपनीशी मोदी सरकारचे साटेलोटे असल्याचा आरोप त्यांनी कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
यावेळी नाना पटोले, काँग्रेस पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी राज्यपालांनी काढलेल्या अधिसूचनेच्या परिपत्रकाची होळी केली. त्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला.

ग्रंथालयांच्या समस्यांना घेऊन ग्रंथालय संघाचे धरणे आंदोलन

गोंदिया,दि.20ः-राज्य शासनाच्या 'गाव तिथे ग्रंथालय' या योजनेला खीळ बसली आहे. वाढत्या महागाईमुळे तटपुंज्या मानधनात ग्रंथपालांना जीवन जगणे कठीण झाले आहे. यासह अनेक समस्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या संचालनात येत आहेत. यासाठी शासनाचे धोरण कारणीभूत ठरत असल्याने सार्वजनिक ग्रंथालय संघाच्यावतीने विविध मागण्यांना घेऊन (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी धार्मिक यांना संघाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन दिले.
राज्यात 'अ, ब, क, ड' या चार वर्गवारीत सार्वजनिक ग्रंथालय अनुदान तत्त्वावर चालत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील वाचकांसाठी ज्ञानदानाची सेवा पुरविण्याचे काम तटपुंज्या मानधनात ग्रंथपाल करीत आहेत. याशिवाय ग्रंथालयच्या संचालनामध्ये शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे अनेक अडीअडचणी निर्माण होत आहेत, त्या दूर करण्यात याव्या, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. परंतु, शासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्यात यावी, ग्रंथालयांना दर्जा वाढ देण्यात यावे, ग्रंथपालांच्या मानधनात वाढ करण्यात यावी आदी मागण्यांना घेऊन जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या वतीने आज (ता.१९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 
धरणे आंदोलन संघाचे अध्यक्ष शिव शर्मा, अँड. र्शावण उके, धनलाल रहांगडाले, विनायक अंजनकर, यशवंत चौरागडे, नेपाल पटले, नरेश गुप्ता, अकरम काजी, सुरेश गिर्‍हेपुंजे आदींच्या नेतृत्त्वात करण्यात आले. दरम्यान संघाच्या पदाधिकार्‍यांनी मागण्यांवर प्रकाश टाकून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला. यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी धार्मिक यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात जिल्ह्यातील सार्वजनिक गं्रथालयाचे ग्रंथपाल, संचालक व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.

पोलीस अधिक्षकांच्या हस्ते गुणवत्ताप्राप्त व सेवानवृत्त पोलिस कर्मचार्‍यांचा सत्कार

गोंदिया,दि.20ः-पोलिस कर्मचार्‍यांच्या आर्थिक अडा-अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने स्थापित करण्यात आलेल्या सन २0१७-१८ पोलिस कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा १८ सप्टेंबर रोजी प्रेरणा सभागृह ,पोलिस आयुक्तालय कारंजा येथे थाटात पार पडली. सभेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व पोलिस दलातून सेवानवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला.
सभेत राखीव पोलिस निरीक्षक कमलाकर पाटेकर,पोलिस पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीराम मिर्शा, उपाध्यक्ष विनोद कल्लो, सचिव मिल्कीराम पटले, खजिनदार शाहीद अंसारी, संचालक वामन थाटकर, ईश्‍वरदास पुरी, संचालक श्रीधर शहारे वरिष्ठ लिपिक भुमेश्‍वरी मुरकुटे, प्रतिभा चव्हाण,सुभाष राऊत महिला पालीस शिपाई शशीकला उके आदी उपस्थित होते. सभेत पतसंस्थेचे संचालक मंडळाच्या वतीने गोंदियाचे पोलिस अधिक्षक हरीश बैजल यांचे शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. पोलिस कर्मचारी सहकारी पतसंस्थेची स्थापना १८ मार्च २00९मध्ये झाली होती. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पतसंस्थे विषयी पोलिसांच्या समस्येचे निराकरण करण्याकरिता ९वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी पोलिस अधिक्षक बैजल यांच्या हस्ते पतसंस्थेत नव्याने सभासद कर्मचार्‍याच्या गुणवत्ता प्राप्त एकूण २३ पोलिस पाल्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार म्हणून शिष्यवृत्ती,स्मृतिचिन्ह व गुलाबाचे फुल तसेच माहे जानेवारी २0१८ मध्ये गोंदिया जिल्हा पोलिस दलातून सेवानवृत्त झालेल्या १४ सभासद कर्मचार्‍यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ब्लँकेट देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बैजल यांनी पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीसाठी नियमित वसुलीच्या कार्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,कोषाध्यक्ष व कार्यालयाचे लेखाशाखेतील मंत्रालयीन स्टॉफचे बहुमोलाची भूमिका आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन नापोशि राज वैद्य यांनी केले.

Wednesday, 12 September 2018

चिचगडच्या पोलीस क्वार्टरला लागली आग

चिचगड,दि.13 : येथील पोलीस ठाण्यामागे असलेल्या पोलीस क्वार्टरमधील रहिवासी पोलीस कर्मचारी विष्णू राठोड यांच्या क्वार्टरला (घराला) मंगळवारी दुपारी २ वाजतादरम्यान आग लागली. या आगीत त्यांच्या घरातील सामानाची चांगलीच नासधूस झाली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याने नुकसान वाढले नाही.
चिचगड पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुमारे १० घरांची चाळ आहे. यातीलच गणूटोला एओपीमध्ये कार्यरत विष्णू राठोड यांच्या घराला मंगळवारी (दि.११) दुपारी २ वाजतादरम्यान आग लागली. चिचगड पोलीस ठाण्यात कार्यरत मनिषा राठोड या त्यांच्या पत्नी यावेळी घरी होत्या. त्यांना आग दिसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात कळविले व ठाणेदार नागेश भास्कर यांनी लगेच देवरी नगर पंचायतमधील अग्निशामक बोलाविले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले स्वत: घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या मदतीने लगेच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र तरिही राठोड यांच्या घरातील सामानाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. शॉटसर्कीटने ही आग लागल्याचा अंदाज वतर्विला जात आहे.

12 to 18 saptember Berar Times Newspaper





Monday, 10 September 2018

ओवारा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

 देवरी:10 निसर्गाच्या सानिध्यात वसलेले, चहू बाजूने डोंगरांनी वेढलेले ओवारा गावामध्ये तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सरपंच हिरामण टेकाम, उपसरपंच कमल येरने, देवेंद्र डोये, पोलीस पाटील कैलास वल्के, नामदेव लाडे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात नंदी सजावट स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये
 प्रथम क्रमांक- स्पृहा अजित टेटे
द्वितीय क्रमांक- अमन जैनेन्द्र बघेले
तृतीय- प्रणव गोपालकृष्ण डोये
यांना देण्यात आला.
सहभागी चिमुकल्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्राचार्य डॉ. सुजित टेटे आणि कुटुंबीयांनी सुद्धा सर्वांना पारितोषिक देऊन सहकार्य केला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम लांजेवार, माधव राव टेटे, भाउदास बिंझलेकर , मोतीराम मेहर यांनी केला.
कार्यक्रमाच्या यशासाठी गावातील  तरुण मंडळींनी मोलाचं सहकार्य केला.

Saturday, 8 September 2018

बनावट विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

भंडारा,दि.0८ः- शहरातील आंबेडकर वॉर्डात सुरू असलेल्या बनावट विदेशी दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून बनावट दारूसाठा व चारचाकी वाहन असा ३ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्तीवर असताना कारधा येथे एका संशयास्पद व्हॅनची (क्र . एमएच १६ बिएच १९९४) झडती घेतली असता, त्याठिकाणी बनावट विदेशी दारुच्या ३५0 बाटल्या आढळून आल्या. या दारुसाठय़ाबाबत आरोपींना विचारणा केली असता त्यांनी आंबेडकर वॉर्डातील एका घरातून आणल्याचे सांगितले. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तात्काळ आंबेडकर वॉर्डातील त्या घरावर छापा टाकला. त्यावेळी प्रशांत दुर्गाप्रसाद मानवटकर (२८) रा. शुक्र वारी, भंडारा, चेतन सुरेश चकोले (२८) रा. शुक्र वारी, भंडारा, गोपाल धनबहादूर ठाकूर रा. आंबेडकर वॉर्ड, गोलू उर्फ सरीन विनोद गोस्वामी (२४) रा. शहीद वॉर्ड, भंडारा, कैलास गोपीचंद मोहरकर (३0) रा.आंबेडकर वॉर्ड भंडारा हे पाच जण बनावट विदेशी दारू तयार करताना आढळून आले.
आरोपींच्या ताब्यातून ओमनी व्हॅन, एक दुचाकी, दारूच्या ९८५ बनावट बाटल्या, मध्यप्रदेशातील सिल्वर जेट व्हिस्कीच्या ४ बाटल्या, २ हजार झाकणे, कॉक, बुच आणि ५५0 बनावट लेबल, स्पिरीटच्या वासाचे केमिकल आणि दारु तयार करण्याचे अन्य साहित्य असा ३ लाख २९ हजार ७२0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाचही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपी फरार आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त अश्‍विनी जोशी, संचालक सुनील चौहाण, उपआयुक्त उषा वर्मा, भंडाराचे अधीक्षक शशीकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तानाजी कदम, दुय्यम निरीक्षक पांडुरंग घरटे, सुषमा कुंभारे, रोहीनी बनकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अरविंद कोटांगले, नरेश उईनवार, अंबूले, संजय कोवे, हेमंत कांबळे, जयघोष जनबंधू, स्वप्नील लांबट, विनायक हरिनखेडे, नरेंद्र कांबळे, सविता गिर्‍हेपुंजे, मंगेश ढेंगे, विष्णू नागरे आदींनी केली

दिग्विजय दिन व गुणवंतांचा सत्कार

लाखनी, दि. ०७ : राष्ट्रीय शिक्षण संस्था तथा विवेकानंद सार्वजनिक वाचनालय लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने दिग्विजय दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 स्वामी विवेकानंद यांच्या विश्वधर्म सभेतील ऐतिहासिक दिनाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 11 सप्टेंबर रोजी दिग्विजय दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त लाखनी येथील स्वागत सभागृहात दुपारी 4 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रतिभा राजहंस राहणार असून उद्घाटन गडचिरोली येथील प्रसिद्ध व्याख्याते पद्मश्री डॉ.राणी बंग करतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, वाचनालयाचे अध्यक्ष छबीलाल रहांगडाले, कार्यवाह अजिंक्य भांडारकर यांनी केले आहे.

Friday, 7 September 2018

ग्रा.प. ओवारा येथे पोषण अभियान कार्यक्रम साजरा


 देवरी: 07(सुजित टेटे) एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण  महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे.  त्या अनुषगाने आज ग्राम पंचायत ओवारा येथे ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर ग्रामसभे मध्ये गावातील लोकांना आमंत्रित करून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सरपंच हिरामण टेकाम, उपसरपंच कमल येरने, मार्गदर्शक म्हणून सचिव  सुभाष तागडे , तं. मु. स. अध्यक्ष देवेंद्र डोये तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि सर्व सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रम ठरल्याप्रमाणे उत्तमरित्या राबविण्यात आला.मुलांचे वजन तसेच वयक्तिक स्वच्छतेची जनजागृती करण्यात आली तसेच शपथ घेण्यात आली.सदर कार्यक्रमात सर्व पदाधिकारी आणि गावकर्यांनी सहकार्य केला.

शेडेपारच्या जि.प. शाळेत स्वयंशासनदिन उत्साहात


देवरी,दि.07 - तालुक्यातील शेडेपार येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या बुधवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेत मुख्याध्यापक घनश्याम देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची रुपरेषा आखण्यात आली होती. संपूर्ण शालेय  दिवस विद्यार्थ्यांनी स्वतःचे शासन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांपासून तर शिक्षक, कर्मचारी यांची भूमिका पार पाडली. शाळेचे प्रशासन कसे चालविले जाते, याचे प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतले.
या उपक्रमास शिक्षक ए.व्ही मेश्राम, एम के चव्हाण आणि ए.बी. नंदागवळी यांनी सहकार्य केले

गोंदिया पोलीस दलाचे 8 शिपाई निलबिंत,अधिक्षकांची कारवाई




गोंदिया,दि.07ः- गोंदिया जिल्हा पोलीस दलातील  8 पोलीस शिपायांना आपल्या कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी तसेच अवैध जुगारव्यवसायाला सरंक्षण दिल्याच्या कारणावरुन पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी निलबिंत केल्याची माहिती सुत्रांनी दिली.या निलबिंत पोलीस शिपायामध्ये गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे 4,रामनगर पोलीस ठाण्याचे 4 शिपायांच्या समावेश असल्याचेही वृत्त आहे.या सर्व निलबिंत पोलीस शिपायांची नावे लवकरच देणार.

कोसबी आश्रमशाळेतील विनयभंग प्रकरणातील आरोपींची संख्या पोचली तीनवर


गोंदिया,दि.7- देवरी तालुक्यातील कोसबी येथील बिरसामुंडा आश्रमशाळेमध्ये घडलेल्या विनयभंग प्रकरणामध्ये आरोपींची संख्या तीनवर पोचल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
सविस्तर असे की, काल गुरूवारी काही महिला कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने देवरी तालुक्यातील कोसबी आश्रमशाळेतील विनयभंगाचा प्रकार उजेडात आला होता. या प्रकरणी देवरीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने चौकशी करून चिचगड पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी चिचगडचे ठाणेदार गांगुर्डे यांनी तपास करून त्या नराधम शिक्षकाला कालच अटक करून गुन्ह्याची नोंद केली होती. या प्रकरणी अधिक चौकशी केल्यावर पोलिसांसमोर पुन्हा दोन आरोपींची नावे समोर आली आहे. 
सदर शाळेत यापूर्वी सुद्धा असे प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये कमालीचा संताप आहे. अशा कर्मचाऱ्यांना संस्थाप्रमुखांचे सरंक्षण प्राप्त असल्याने या शाळेत या घटना नवीन नसल्याचे बोलले जात आहे.
अटकेत असलेल्या आरोपीचे नाव सुनील मारोतराव कांबळे (वय 45) असे असून इतर आरोपींमध्ये दीपक श्रीपत कांबळे (वय 32) आणि भोजराज मोदेकर (वय28) यांचा समावेश आहे.

Thursday, 6 September 2018

कोसबी आश्रमशाळेच्या शिक्षकावर विनयभंगाचा आरोप

गोंदिया,दि.६- देवरी तालुक्यातील कोसबी येथील बिरसामुंडा आदिवासी आश्रमशाळेतील एका शिक्षकाने दोन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा संतापदायक प्रकार समोर आला आहे. उल्लेखनीय म्हणजे या शिक्षकाने गेल्यावर्षीसुद्धा असा प्रकार केल्याचा आरोप आहे.
सविस्तर वृत्त असे की, देवरी तालुक्यातील कोसबी येथे साकोलीच्या सर्वांगीण शिक्षण संस्थेद्वारा बिरसामुंडा आश्रमशाळा चालविली जाते. या आश्रमशाळेत ५वी चे १० वी पर्यंत शिक्षणाची सोय असून येथील वसतिगृहात ५४ मुली आणि १८ मुले निवासी असल्याची माहिती आहे. .या शाळेतील एका माध्यमिक शिक्षकाद्वारे इयत्ता ९ वी व १०वी मध्ये शिकणाऱ्या दोन मुलींचा विनयभंग करण्याचा संतापदायक प्रकार गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. या प्रकाराला या पीडित मुलींनी नेहमी विरोध करत या प्रकाराची माहिती शालेय प्रशासनाला दिल्याचे त्या पीडित विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. हा प्रकार काही महिलांना माहीत झाल्याने त्यांनी आज (दि. ६) हे प्रकरण देवरीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे प्रकल्प अधिकारी यांनी सहायक प्रकल्प अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोरगाव येथे सुरू असलेल्या क्रीडास्थळी पाठविले. या अधिकाऱ्यांनी सदर पिडीतांचे बयाण नोंदविल्यानंतर या आरोपी शिक्षकाविरुद्ध चिचगड पोलिसांत तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी पीडित वा त्यांचे पालक आल्याशिवाय आम्ही तक्रार नोंदविणार नाही, असे म्हटल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. असे असले तरी चिचगड पोलिसांनी बोरगाव येथे जाऊन त्या विद्यार्थिनींचे बयाण नोंदविले. उशिरा रात्री पर्यंत गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती.
दरम्यान, गेल्या वर्षीसुद्धा याच शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आदिवासी विकास मंत्रालयाकडून चौकशीचे पत्र दि.१६ जून २०१७ रोजी आदिवासी आयुक्तालयाला दिले होते. मात्र, पुढे या कार्यवाहीचे काय झाले, याबाबत विचारले असता प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या कानावर हात ठेवले. दरम्यान, सदर शिक्षकाला प्रथमदर्शनी आरोपी मानून प्रकल्प अधिकाऱ्यांनी संस्थेला निलंबित करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले आहे.

Wednesday, 5 September 2018

ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे कृष्ण जन्माष्टमी साजरी

देवरी:5सप्टे. येथील लोकप्रिय शाळेत अग्रगण्य ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल, प्राचार्य डॉ. सुजित टेटे आणि अनिता निखारे प्रामुख्याने उपस्थित होते. दरवर्षी कृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटात शाळेत साजरा केला जातो. ठरल्या प्रमाणे चिमुकले विध्यार्थी राधा आणि कृष्णाच्या वेशभूषेत सहभागी झालेले होते.
सहभागी राधा आणि कृष्णानीं आपले मनोगत स्वतंत्रपणे व्यक्त केले आणि सामूहिकरित्या नृत्य सादर केले.
सरते शेवटी कृष्णाच्या वेशभूषेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दही हंडी फोडून आनंद द्विगुणित केला. सर्वांना बक्षीशे आणि प्रसाद वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी शिक्षिका सरिता थोटे, कलावती ठाकरे, श्रमिका पातोडे, मनीषा काशिवार आणि नलु टेम्भरे यांना देण्यात आली होती.
सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येत पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशासाठी नितेश लाडे, राहुल मोहुर्ले, विश्वाप्रित निकोडे, चंद्रकांत बागडे, वैशाली टेटे यांनी सहकार्य केला.

Monday, 3 September 2018

चिचगड वसतिगृहात जन्माष्टमी साजरी

चिचगड: 2सप्टें. शा. आ. मुलांचे व मुलींचे वसतीगृह चिचगड आणि छत्रपती प्रतिष्ठान चिचगड यांचे संयुक्त विध्यमाने श्री कृष्ण जन्माष्टमी निम्मित भव्यशोभा यात्रा, दहीहंडी आणि गोपाळकाला कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला.
याप्रसंगी दोन्ही वसतिगृहाच्या मुले आणि मुली श्री कृष्ण आणि राधा तसेच भारत माता तसेच क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचे वेशभूषा धारण करून शोभायात्रे मध्ये सहभागी झाले होते.
प्रसंगी चिचगड गावात वेगवेगळ्या जागी दहीहंडी वसतीगृह आणि गावातल्या होतकरू नवयुवकाद्वारे फोडण्यात आली.
आणि समस्त गावात गोपाळकाला वाटप करण्यात आला.
गावातील आदरणीय आणि माननीय यक्ती कडून झाकी मध्ये संमिलीत प्रत्येक वेशभूषा धारण केलेल्या मुले आणि मुलींना पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही वसतिगृहाच्या गृहपाल किशोर देशकर , कुमुद देशकर, सर्व मुले आणि मुली तसेच छत्रपती प्रतिष्ठान च्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक आणि मोलाचे साथ आणि सहकार्य केले.

Saturday, 1 September 2018

न्यू सीता पब्लिक स्कूल च्या मिनी गोविंदानी थाटात फोडली दहीहंडी



देवरी,दि.01 -  स्थानिक सीबीएसई संलग्न न्यू सीता पब्लिक स्कूल व सीता पब्लिक स्कूलच्या वतीने संयुक्तरीत्या जन्माष्टमीचा  कार्यक्रम आज (दि.01) देवरी येथे आयोजित करण्यात आला होता. 
या दोन्ही शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यासाठी कृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नर्सरी ते पहिल्या वर्गातील सर्वच विध्यार्थी सहभागी झाले होते. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गटवार दहीहंडी सजावट स्पर्धा घेण्यात आली.  या स्पर्धेतील सर्वच स्पर्धकांनी आपापले कसब पणाला लावले. यामध्ये दिशा पटले ही सर्वोत्कृष्ठ ठरली. दोन्ही शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनीनी गोविंदापथके बनवून दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले. न्यू सीता पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी चार थरांचा मानवी मनोरा उभारून हंडी फोडली. सर्व विजेत्यांना व गोविंदाना पारितोषिक देण्यात आले. .
या कार्यक्रमाप्रसंगी सीता शिक्षण संस्था चे उपाध्यक्ष अंकित अग्रवाल हे उपस्थित होते. स्पर्धेत मूल्यांकन पालक प्रतिनिधी सौ. गजबे ,सौ. नंदागवळी व श्री. श्रीवास्तव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य रवी खरवडे व मुख्याध्यापक संजय बिंझलेकर यांच्या मार्गदर्शनात हरिश उके, भुपेंद्र सूर्यवंशी, मनोज पेटकुले, रीना चांदेवार ,  प्रियांका लाडे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

मृत कर्मचाऱ्याच्या विधवेला ग्राहक पतसंस्थेची मदत

देवरी,दि.1- एकीकडे आमदार खासदारांना गलेलठ्ठ पगार आणि कोट्यवधीचा आरोग्य विम्याचे कवच पुरवून शासकीय तिजोरीची लूट करणारे सरकार, दुसरीकडे मात्र अंशदायी पेंशन योजनेतील कर्मचाऱ्याचा सेवाकालात मृत्यू झाल्यास त्याला कोणतेही आर्थिक संरक्षण देत नाही. परंतु, आपल्या एका सहकाऱ्यावर ती दुर्दैवी वेळ आल्याने त्याच्या विधवेला मदतीचा हात म्हणून दोन लाखाची मदत करण्याचे पुण्यकार्य ग्राहक पतसंस्था भंडारानी केले. सरकार निष्ठूरपणे वागत असली तरी समाजातील माणुसकी अद्याप हरपली नसल्याचे उदाहरण यानिमित्ताने देवरी तालुक्यात समोर आले आहे.
 सविस्तर असे की, 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना डीसीपीएस योजना लागू आहे. परंतु, या योजनेत असताना  एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला कोणत्याही प्रकारचा आर्थिक आधार मिळत नाही. परंतु, ग्राहक पतसंस्था भंडारा तर्फे माणुसकी जपत मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देऊन समाजात चांगला संदेश दिला आहे. देवरी तालुक्यातील वडेकसा जि.प.शाळेतील शिक्षक अनुहरलाल जांभुळकर यांचे आकस्मिक निधन झाले.  दुःखाची कुऱ्हाड कोसळल्याने त्यांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत सापडले. प्रशासनाने आर्थिक मदतीबाबतीत हात झटकले.असे असताना ग्राहक पतसंस्था भंडाराने जांभुळकर कुटुंबियांना दोन लाख रुपये सानुग्रह निधी देत आधार दिला आहे. 
यावेळी गटसाधन केंद्रात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात ही मदत श्रीमती जांभूळकर यांना सोपविण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश कश्यप, प्राथमिक शिक्षक समितीचे जी.एम.बैस, गजानन पाटणकर, बहेकार सर, वाघाडे सर, खांडेकर सर, प्रवीण सरगर, सदाशिव पाटील, शीतलकुमार कनपटे, पंकज राठोड, यशवंत टेंभुर्णे,गणेश कांगने,राजकुमार बारसे इत्यादी शिक्षक उपस्थित होते.

‘रिमोट’द्वारे वीज चोरी करणाऱ्यांची आता खैर नाही; महावितरणची आजपासून विशेष मोहीम

गोंदिया,दि.01 : नवनवीन युक्ती वापरून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढीस लागल्याच्या पृष्ठभूमीवर महावितरणकडून रिमोट कंट्रोलद्वारे वीज चोरी करणाºयांविरोधात राज्यभरात १ सप्टेंबर २०१८ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाºया कंपनी विरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
महावितरणच्यावतीने वीज चोरीवर आळा घालण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. वीज चोरी रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते; परंतु अलीकडच्या काही वर्षांत रिमोट कंट्रोलद्वारे वीज चोरी होत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत मुंबईत ३० आॅगस्ट २०१८ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अशा वीज चोरीच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्याचा व कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मोहीम १ सप्टेंबर २०१८ पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.
महावितरणच्या विद्युत मीटरमध्ये फेरफार करण्याचे कसब या यंत्रणेशी संबंधित कुशल कारागीर किंवा तंत्रज्ञांकडेच असते. वीज ग्राहकांकडून काही हजार रुपये घेऊन हे कारागीर रिमोट कंट्रोल तयार करून देतात. अशा तांत्रिक कारागिरांवरही आता महावितरणची करडी नजर आहे.
वीज चोरीची माहिती देणाºयास बक्षीस
रिमोटद्वारे वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी महावितरणला त्याची माहिती द्यावी. अशा वीज चोरीची माहिती देणाºयांना वीज चोरीच्या अनुमानित रकमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरूपात बक्षीस म्हणून देण्यात येते, तसेच अशी माहिती देणाºयाचे नावदेखील गुप्त ठेवण्यात येते. त्यामुळे अशा वीज चोरीची माहिती देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

भंडारा, गडचिरोली, बुलडाणा येथे पासपोर्ट सेवा केंद्र

गोंदिया,दि.01  : ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात बुलडाण्यासह ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे ही माहिती दिली.
नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी २०१७ मध्ये देशभरात २८९ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. टप्प्याटप्प्याने या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत आहे. पहिल्या तीन टप्प्यात महाराष्ट्रात २५ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. यापैकी आतापर्यंत १४ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाली आहेत. तर ४ सप्टेंबर २०१८ रोजी बारामती येथे नवीन केंद्राची सुरुवात होणार आहे. आता राज्यात बुलडाणा, भंडारा, गडचिरोली, रामटेक, उस्मानाबाद, हिंगोली,परभणी, धुळे, रावेर, रायगड आणि भिवंडी याठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा क्रेंद्र उभारण्यात येणार आहेत.
गेल्या दीड वर्षात १४ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात आली. यामध्ये वर्धा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, सांगली,कोल्हापूर, सातारा, घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड, पंढरपूर, नांदेड, सिंधुदुर्ग या शहरांचा समावेश आहे. या नवीन केंद्रांद्वारे पासपोर्ट वितरणाचे कार्यही सुरू झाले आहे. बारामती येथे ४ सप्टेंबर रोजी पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असून, यानंतर अकोला,अमरावती, चंद्रपूर, डोंबिवली, लातूर, माढा, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, नवी मुंबई, पनवेल याठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याच्या दिशेने कामास सुरुवात होणार आहे.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...