
सरपंच गणेश तवाडे यांच्या हस्ते तर भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका महामंत्री कुलदीप लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष अतिथी म्हणून पं. स. सदस्य अर्चना ताराम, घनश्याम निखाडे तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील अमृत बोहरे, ग्रा.पं. सदस्य कमलेश मडावी, शा. व्य. समिती अध्यक्ष जगदीश बोहरे, केशव मेंढे, दादुराम बन्सोड, धनलाल बन्सोड, राजेंद्र बागडे, ज्ञानेश्ववर बागडे उपस्थित होते.
विद्येची देवता माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून डिजिटल वर्गखोलीचे मान्यवरांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक तवाडे यांनी गावाच्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ग्रामपंचायतचे धोरण व नियोजनाविषयी माहिती दिली. अध्यक्ष लांजेवार यांनी पालकांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाकडे प्रवृत्त करून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा विषयी आवड निर्माण करावी, जेणेकरून या नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थी भविष्यात प्रशासकीय सेवेत पोहचू शकतील, असे प्रतिपादन केले.
No comments:
Post a Comment