
या डिजीटल वर्गखोलीचे उद्घाटन सुकळीच्या सरपंच लीला मुंदी यांचे अध्यक्षतेत पालांदूरचे केंद्रप्रमुख एन एस लंजे यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर पुराम, रमेश केराम, देवरी समूह साधन केंद्राचे विषयतज्ज्ञ मस्के, श्रीमती पटले, घरडे, कंभरे, राऊत, घासले, निपाणे, रामटेके, ठवकर, हुडरा, खोब्रागडे, उके, मडावी, राठोड, मिरी, जांभूळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि रांगोळी स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. वर्गखोली डिजीटल करण्यासाठी ग्रामपंचायतीने 15 हजार आणि शिक्षण व गावकरी मिळून 15 हजाराचा निधी पुरविला.यावेळी गावकऱ्यासाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संचलन श्री. आर.बी.धमगाये यांनी केले. प्रास्तविक मुख्याध्यापक एम.के.चव्हान यांनी तर उपस्थितांचे आभार हुंडरा यांनी मानले. यावेळी पालांदूर केंद्रातील सर्व शिक्षक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment