
आमगावः गोंदिया जिल्हा परिषदेच्या "गुढी पाडवा प्रवेश वाढवा" या अभिनव उपक्रमांतर्गत सन् 2017-18 या वर्षात पहिल्या वर्गात प्रवेश घेणा-या बालकांचे प्रवेश व सत्काराला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आले. दरम्यान, काल तालुक्यातील बिरसीच्या जि.प. प्राथमिख शाळेत पहिल्या वर्गात प्रवेशित 20 मुला मुलींचा सत्कार अंकलिपी व पुष्पगुच्छ देऊन जि.प अध्यक्ष ऊषाताई मेंढे यांचे हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांना चौमुखी ज्ञान व सर्वागिण विकास हा जि प शाळेतून प्राप्त होतो. यासाठी सर्व पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतच भरती करावे, असे आवाहन श्रीमती मेंढे यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमगाव पं. स. चे सभापती हेमलता डोये , पं.स. सदस्य लोकेश अग्रवाल, उपसरपंच मुनेश्वर खोब्रागडे, केंद्रप्रमुख डी.एल. गुप्ता, जामखारी चे भैयालाल बावनकर, शा.व्य.स. उपाध्यक्ष ममता पटले, मुख्या. एल यू खोब्रागडे, सदस्य सारीका पटले, उर्मीला बावनथडे व श्रीमती पटले, तंत्रस्नेही शिक्षक विकास लंजे आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व प्रथम गावात प्रभात फेरी काढून प्रवेश वाढविण्यासंबधी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमा प्रसंगी सभापती डोये, गुप्ताजी ,सारीका पटले व एल यू खोब्रागडे यांनी आपापले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचलन वर्षा बावनथडे यांनी केले. उपस्थितांचे आभार पक्षीमित्र जैपाल ठाकूर यांनी केले.
No comments:
Post a Comment