Monday 9 April 2018

अज्ञात वाहनाच्या धडकेने हायटेन्शन वायर 33 केवी लाईन वर पडून 50 हजाराचे नुकसान

हायवे बांधकाम सुरू असतानाची घटना
मोठा अनर्थ टळला
आठवड्यातील दुसरी घटना
लोहारा/देवरी: 9एप्रिल (सुजित टेटे)
देवरी पासून 12किमी अंतरावरील लोहारा येथे मोठा अनर्थ टळला. सध्या हायवे बांधकामाने गती पकडली आहे. रस्त्याची उंची वाढली आहे. रहदारीचे प्रमाण मोट्या प्रमाणात वाढले आहे. एकेरी वाहतूक आणि रस्त्याचे काम याकडे काही गोष्टी कडे दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे भविष्यात अश्या घटना ची पुनरावृत्ती होणार वाजवीचे ठरणार नाही.
सदर वृत्त असे कि देवरी आमगाव रोड वर लोहारा येथे वाहनाच्या धडके मध्ये हाय टेन्शन वायर तुटून 33केवी लाईन वर पडले त्यामुळे  शिशुपाल सिंग पवार यांच्या 4 एकर शेतात आग लागली त्यामध्ये 58 पाईप आणि 4 एकर शेतातील तनिस जाळून खाक झाली. वेळेवर प्रसंगावधान साधून लाईट बंद करण्यात आली आणि आग विझविण्याचा प्रयत्न केले गेले. या घटने मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु हायवे कामामुळे इलेक्ट्रिक पोल तुटणे , वायर तुटणे अश्या घटना सतत घडत आहे त्यामुळे सदर विभागातील अधिकाऱ्यावर कारवाई करून समोर योग्य पद्धतीने काम करायला पाहिजे असे नागरिक मागणी करत आहेत.
सदर घटनेमुळे शिशुपाल सिंग पवार यांनी नुकसान भरपाई ची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...