Saturday 14 April 2018

देवरीच्या आसमंतात 'एकच साहेब....'ची गर्जना!

संपूर्ण शहर निळ्या रंगात न्हाऊन निघाले



देवरी,दि.14- भारतीय संविधानाचे जनक तथा ज्ञानयोगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंती दिनी देवरीचे आसमंत 'एकच साहेब, बाबासाहेब' च्या गर्जनेने दणाणून सोडले. शहरात या निमित्ताने शांततापूर्ण मार्गाने एका विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
विश्वगुरू डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ता देवरी शहरासह परिसरातील सर्व आंबेडकर यांचे अनुयायी स्थानिक मुलगंध कुटी बौद्ध विहारात एकत्र येऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी एका विशाल रॅलीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. समता सैनिक दलाच्या शिस्तबद्ध नेतृत्वात बॅड आणि ढोलताशाच्या गजरात या रॅलीचे नगरभ्रमण सुरू आहे. शहरात बाबासाहेबांचे पोस्टर, कटआउट्स आणि होर्डिंग लावून डॉ. आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. भीमसैनिकांची ही रॅली सध्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे यांचे नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त असून शांततेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात ठिकठिकाणी या रॅलीचे स्वागत करण्यात येत असून भीमसैनिकांसाठी अल्पोपहार आणि शरबताची सोय अनेक संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...