नवी मुंबई,दि.08(विशेष प्रतिनिधी) – रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेले आर्थिक गुन्हे शाखेचे एसीपी राजकुमार चाफेकर यांचा ठावठिकाणा अखेर लागला असून, एसीपी चाफेकर हे मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे असल्याचे समोर आले आहे. चाफेकर हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती.दरम्यान, एसीपी राजकुमार चाफेकर हे मध्य प्रदेशमधील जबलपूरच्या रेल्वे स्थानकावर सापडले. त्यांना आणण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. मात्र ते नेमके जबलपूर ला का व कसे गेले आणि त्यांच्या तिथे जाण्याचे नेमके कारण काय याविषयीचे गूढ निर्माण झाले आहे. राज चापेकर यांनी गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक म्हणून यापुर्वी काम केलेले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment