गोंदिया, दि.१ : लक्ष्यवेधी आणि सर्वसामान्यांच्या लक्षात राहणारी कृती करणारे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंजि.राजकुमार बडोले व तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले यांनी शनिवारी गोेरेगाव येथे भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे आयोजित युवा संकल्प मेळाव्यानिमित्त काढण्यात आलेल्या बुलेट बाईक रॅलीदरम्यान आपआपल्या तालुक्यातून प्रवास करतांना ‘बुलेटराजा’ असलेल्या महोदयांकडून विना हेल्मेट बुलेटचा वापर करीत वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.पालकमंत्री राजकुमार बडोेले हे सडक अर्जुनी येथून भाजपयुवा कार्यकर्त्यासोबंत सकाळी 10 वाजता तर तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले हे तिरोडा येथून कार्यकर्त्यांसोबत रवाना झाले.त्यावेळी त्यांनी हेल्मेटचा वापर टाळत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे.या घटनाक्रमानंतर वाहतूक नियमांचा भंग करीत बुलेटवरून प्रचार केल्याची जिल्ह्यात दिवसभऱ चर्चा सुरु होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment