Sunday 18 September 2016

गोंदियामध्ये 1 डिसेंबर 16 ते 14 फेब्रुवारी 2017 दरम्यान दुसऱ्या ‘सारस महोत्सवा’चे आयोजन


पालकमंत्री ना.राजकुमार बडोले यांची माहिती  
मुंबई, दि. 17 : गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्यासंबंधी पर्यटकांना माहिती व्हावी व तो पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे यावा यासाठी गोंदिया जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने 1 डिसेंबर 2016 ते 14 फेब्रुवारी 2017 या कालावधीत दुसरे ‘सारस महोत्सव’ होणार आहे. यानिमित्त विविध स्पर्धा, तसचे पर्यटकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती गोंदियाचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी आज येथे दिली.
सारस महोत्सवाची माहिती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सारस पक्ष्याची माहिती देणाऱ्या सीडीचे तसेच गोंदिया जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया’ या माहिती पटाचे अनावरण करण्यात आले.
श्री. बडोले म्हणाले की, गोंदिया जिल्ह्याला सांस्कृतिक, निसर्गाचा मोठा वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील तलावे, प्रेक्षणीय स्थळे आहेत. तसेच उडणारा सर्वात उंच पक्षी म्हणून ओळखला जाणारा सारस पक्षी या जिल्ह्यात आढळून येते. पर्यटनासाठी मोठी संधी या जिल्ह्याला उपलब्ध असून त्याची ओळख जगाला उपलब्ध व्हावी, यासाठी गोंदिया महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. तसेच सर्वात सुंदर असलेल्या सारस पक्ष्याची ओळख जगाला व्हावी, लोकांना त्याच्याबद्दलची माहिती व्हावी, यासाठी ‘सारस महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. या काळात सारस पक्ष्याची छायाचित्रे काढण्याची संधी मिळणार आहे.
गोंदिया महोत्सवादरम्यान येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यातील दहा प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यात येणार आहेत. तसेच नवेगाव नागझिरा फोटोशूट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी www.gondia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. या महोत्सवास जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. बडोले यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी श्री. सुर्यवंशी म्हणाले की, सारस पक्ष्याच्या रुपाने गोंदिया जिल्ह्याला देखणा पक्षी लाभला आहे. या पक्ष्याबद्दलची स्थानिकांची गैरसमजूत काढून या पक्ष्याच्या संवर्धनासाठी त्यांचा सहभाग घेण्यासाठी सारस महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. याकाळात या पक्ष्याच्या संवर्धनासाठी जनजागृती कार्यक्रम केले जात असून त्यात स्थानिकांचा सहभाग घेतला जातो. गेल्या वर्षीच्या महोत्सवाला सुमारे 350 वन्यजीव  छायाचित्रकारांनी उपस्थिती दर्शविली होती. सध्या जिल्ह्यात 45 सारस पक्षी आहेत. पुढील काळात त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.





No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...