Sunday 4 September 2016

हरितालिका पुजनाला गेलेल्या महिलांवर काळाची झडपः सहाचा मृत्यू



नागपूर- हरितालिकेचे पुजन करून सुखी संसाराची स्वप्ने बघणाऱ्या चार महिला व त्यांच्या समवेत तलावावर गेलेल्या दोन बालकांवर काळाने आज सकाळी 9 च्या सुमारास झडप घातली. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील सावंगी देवली येथे घडली. या घटनेनंतर गावात सर्वत्र शोककळा पसरली.
मृतांमध्ये मंदा नागोसे (45), प्रिया रामप्रसाद राऊत (17) जानव्ही ईश्वर  चोधरी (13) पूनम तुलशिराम डडमल (18) प्रणाली भगवान राऊत (16) व पूजा रतन डडमल (17) यांचा समावेश आहे.
 आज हरितालिका निमित्त पुजनाला सावंगी येथील महिला गेल्या त्या कायमच्या परत न येण्यासाठीच. सकाळीच आपापली घरकामे नित्याप्रमाणे आटोपून गावातील काही महिला व बालके हे मंगळागौरी निमित्त गावच्या तलावावर गेल्या. त्या महिलांसमवेत काही लहान बालके सुद्धा होती. तलावाच्या काठावर हरितालिकेचे पुजन सुरू असताना काही  महिला ह्या पाण्यात उतरल्या, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्या. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात इतर महिला व 2 बालकांचा  पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला.
ही वार्ता गावात पसरताच तलावावर एकच गर्दी उसळली. सकाळी दहा पर्यंत सर्व मृतदेह पाण्याबाहेर काढल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...