Saturday 17 September 2016

खासदार दत्तकग्राम पाथरीतील विकासकामात भ्रष्टाचार-नागरिकांचा आरोप

गोंदिया,दि.१६ -जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पाथरी हे गाव खासदार दत्तक ग्राम योजनेतर्गंत विकासाकरीत राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दत्तक घेतले.त्या गावाच्या विकासासाठी खा.पटेलांनी आपल्या खासदारनिधीसह अदानी फाऊडेंशनच्या सीएसआर व शासकीय योजनेच्या इतर निधीची कामे प्रस्तावित केली. खासदार आदर्श ग्राम पाथरीची निवड प्रफुलभाईंनी करताच संपूर्ण गावकèयांनीही आपूलकीने व एकजुटीने लोक सहभाग दिला.खासदार पटेलांनी घेतलेल्या प्रथम आढावा बैठकीतच तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी आणि पत्रकारांसमोर गावात होणारी विकास कामे दर्जेदार व गुणवत्तेदार व्हावी, अशी सुचना दिली होती.मात्र ग्राम पंचायतीची सत्ता स्वतःकडे काबिज होण्यापुर्वी खा. पटेल यांचे प्रतिनिधी गोरेगाव पंचायत समितीचे सदस्य केवल बघेले यांनी आपुलकीचा ढोंग रचत गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक न घेता निर्विरोध व्हावी,अशी गावकèयांची अपेक्षा असतांना सुध्दा स्वतःचा स्वार्थासाठी गावात स्पर्धात्मक निवडणूका बघेलेंमुळे झाल्या

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...