Tuesday 13 September 2016

वीज वितरण कार्यालयाला लागलेल्या आगीत ४५ हजाराचे साहित्य खाक



देवरी- स्थानिक वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाला काल लागलेल्या आगीत सुमारे ५० हजाराचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आज मंगŸळवारी (ता. १३) आग लागलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु होते. दरम्यान. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अग्निशमन यंत्र नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सविस्तर असे की, देवरी येथील वीज वितरण कंपनीचे विभागीय कार्यालय आहे. काल सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे या कार्यालयाच्या एका खोलीला आग लागली. ही आग तांत्रिक विभागात असलेल्या इन्वर्टर सेक्शनजवळ लागल्याने तेथे असलेले इन्वर्टर, २ बॅटèया, एक अलमारी आणि काही महत्त्वाच्या फायली जळून खाक झाल्या. यात कंपनीचे सुमारे ५० हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, सदर इन्वर्टर हे तांत्रिक विभागात अत्यंत अडचणीच्या ठिकाणी ठेवले असून कार्यालयीन वेळेत सदर घटना घडली असती तर मोठे अनर्थ होण्याची शक्यता होती. वीज वितरण कंपनीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यालयात अग्निशमन यंत्रणा नसल्याचा धक्का दायक प्रकार समोर आला आहे. या कार्यालयातून पाच उपविभागीय कार्यालयाचा कार्यभार चालत असल्याने येथे अत्यंत महत्त्वाचे दस्त असतात. याशिवाय येथे अधिकारी-कर्मचारी संख्या मोठ्या प्रमाणावर असून ग्राहकांचे येणेजाणे सुद्धा असते. यामुळे या कार्यालयामध्ये अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे. परंतु, या बाबीकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष आहे. नागरिकांच्या दक्षतेमुळे या अग्निकांडाचे भीषण स्वरूप वेळीच आटोक्यात आल्याने मोठी हानी टळली. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...