Thursday, 30 May 2019

ओबीसी विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना लागू
चंद्रपूर- राज्य शासनाने इयत्ता 1ली ते 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. यामुळे ओबीसी प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
इतर मागास प्रवर्गातील गरीब कुटुंबातील अनेक मुलांना त्यांच्या पालकांच्या पारंपारिक व्यवसायामध्ये मदत करावी लागत होती. त्यामुळे या कुटुंबातील मुले शाळेत नियमित जाऊ शकत नव्हती. केंद्र सरकाने ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी 1998-99 पासून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू केली होती. या योजनेची सुरवात राज्यात करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. 
आता इयत्ता 1 ली ते 10वीमध्ये शिकत असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राज्य सरकारने चालू शैक्षणिक सत्रापासून लागू केली आहे. या योजनेंतर्गत आनिवासी इयत्ता 1ली ते 10वी च्या विद्यार्थ्यांना 10 महिन्यासाठी प्रती माह 100 रुपये तर निवासी इयत्ता 3रीचे 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रती माह 10 महिन्यासाठी 500 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तसेच तदर्थ अनुदान म्हणून वार्षिक 500 रुपये निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र शासन 50 टक्के  व राज्यशासन 50 टक्के निधी देणार आहे. ही योजना लागू करावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्यशासनाकडे रेटून धरली होती. ही मागणी मान्य झाली आहे.
ही पात्रता हवी
विद्यार्थ्यांच्या पालकांची उत्पन्न मर्यादा वार्षिक 2.50 लाख रुपये असावी. या योजनेचा लाभ शासनाच्या मान्यता प्राप्त शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल. तसेच विद्यार्थ्यांची किमान 60 टक्के उपस्थिती अनिवार्य राहील.

नरेंद्र मोदींनी देशाचे नेतृत्व करणे ही ईश्वरी योजना – उद्धव ठाकरे

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे. देशासमोर अनेक प्रश्न असू शकतात. नव्हे, ते आहेतच, पण त्या प्रश्नांचा डोंगर हिमतीने फोडण्याचे साहस पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या छातीत व मनगटात आहे. मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्याचे हेच महत्त्व आहे. दिल्लीतील त्यांचा शपथ सोहळा हा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखातून त्यांनी मोदींची स्तूती केली आहे. तसेच मोदी यांनी देशाच्या जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे. ते कालपर्यंत चौकीदार होते, पण आज ते पालक बनले असल्याचे अग्रलेखात म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर लोकशाही संकटात येईल अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. ज्यांनी ही भीती व्यक्त केली व आपली लढाई मोदी यांच्या हुकूमशाहीविरुद्ध असल्याची आरोळी ठोकली अशा मंडळींमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या असं ही उद्धव ठाकरे  यांनी म्हटलं आहे.

वृक्षलागवड मोहीम मिशन मोडवर राबवतांना लोकसहभाग वाढवा- सुधीर मुनगंटीवार



* 33 कोटी वृक्षलागवड मोहीमेचा आढावा

* विभागात 5 कोटी 94 लक्ष ,56 हजार वृक्षलागवडीचे उददीष्ट

* झाडांचे जीवंत राहण्याचे प्रमाण 89.65 टक्के

* मिशनमोडवर मोहीम यशस्वी करा

नागपूर: पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच  वक्षाच्छादनाचे 33 टकके राष्ट्रीय उददीष्ट पुर्ण करण्यासाठी राज्यात 33 कोटी वृक्षलागवडीची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेला मिशनमोडवर राबवितांनाच लोकसहभाग वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
वनामती येथे नागपूर विभागातील 33 कोटी वृक्षलागवड मोहीमेचा आढावा वनमंत्री यांनी घेतला.या बैठकीला महापौर नंदा जिचकार,जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर,आमदार प्रा. अनिल सेाले ,आमदार सुधीर पारवे, आमदार रामदास आंबटकर ,चंद्रपूरच्या महापौर योगीताताई भोंडेकर वनविभागाचे सचिव विकास खारगे,विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार ,प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेश अग्रवाल, प्रधान मुख्यवनसंरक्षक वन्यजीव नितीन काकोडकर अतिरिक्त प्रधान मुख्यवनसंरक्षक बी.एस. हुड्डा, शैलेश टेंभुर्निकर, श्रीनिवास राव, कल्याण कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यासह विभागातील सर्व जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यपालन अधिकारी, विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
33 कोटी वृक्ष लागवड ही मोहीम राज्यात यशस्वी करण्यासाठी विभागनिहाय आढावा घेण्यात येत असुन या मोहीमेला व्यापक प्रतिसाद  मिळत असल्याचे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की नागपूर विभागासाठी 5 कोटी 94 लक्ष 56 हजार एवढे उददीष्ट ठरविण्यात आले आहे.हे पूर्ण करण्यासाठी जील्हा निहाय नियोजन करण्यात आले असुन या मोहीमेला 1 जुलैपासुन आनंदवन येथुन सुरूवात होत आहे.विभागात वृक्ष लागवडीसाठी 4 कोटी 3 लाख खडउे तयार करण्यात आले असुन वृक्षारोपनाची माहीती  सर्वाना
उपलब्ध्‍ व्हावी यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध्‍ करून देण्यात येत आहे.ही मोहीम अत्यंत पारदर्शकपणे तसेच वृक्षलागवडीबददल जनतेमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी कमांड रूम सुध्दा तयार करण्यात आली असल्याची माहीती त्यांनी यावेळी दिली.
नागपूर विभागात मागील तीन वर्षापासुन ही मोहीम यशस्वी पणे राबविण्यात येत असल्याचे सांगतांना वनमंत्री म्हणाले की,या मोहीमेतील झाड जिवंत राहण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे दिसून येते.पहील्या वर्षी 2 कोटी वृक्षलागवडीपैकी 81.36 टकके वृक्ष जिवंत आहेत.तसेच 2017 मध्ये 4 कोटी क्षलागवडीपैकी 86.92 तर  मागील वर्षी 13 कोटी वृक्षलागवड मोहीमेतर्गत 89.65  टकके वृक्ष जिवंत आहेत.
वृक्षारोपण मोहीमेसोबतच लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगतांना वनमंत्री म्हणाले की सामाजिक उददेश समोर ठेवून मुलीच्या जन्माचे स्वागत करतांना  कन्या वन समृध्दी योजनेच्या माध्यमातुन 10 झाडे देण्याचे धोरण स्विकारले आहे.यापैकी 5 झाउे ही सागाचे असुन इतर 5 झाडे फळवृक्ष आहेत.तसेच जिल्हा नियोजन मंडळ,आमदार निधी यामधुनही
वृक्षारोपनासाठी निधीची उपलब्‍धता व्हावी म्हणुन शासन आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.यामुळे जिल्हास्तरावर मोठया प्रमाणवर वृक्ष लागवड मोहीम राबवायला सुरूवात झाली आहे.
वनक्षेत्र असलेल्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी प्रमाणत असुन तेथे टॅकर लावण्याची आवश्यकता नसल्यामुळे दुष्काळ निवारणासाठी वृक्षारोपन महत्वाचे आहे.राज्यातील 483 ग्रामपंचायतीचा ग्रामसमृध्दी योजनेत समावेश करण्यात आले असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की बांबुचे क्षेत्र वाढविण्यासाठी बांबु मिशन राबविण्यात येत आहे.या मिशन मार्फत राज्यात 4 कोटी बांबु लावण्याचा  निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगीतले.
वृक्ष लागवड हे जन आंदोलन व्हायला हवे. वृक्ष लागवड मोहिमेत मोठ्या प्रमाणात सर्व नागरिक सहभागी झाले तरच 33% हरित महाराष्ट्र मोहीम यशस्वी होवू शकेल. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया यांच्या २०१७ च्या सर्वेक्षण अहवालानुसार नागपूर जिल्ह्यातील वनाच्छादित क्षेत्र २०.४१ % आहे. तर वर्धा जिल्ह्यात हे प्रमाण १३.६८% आणि भंडारा जिल्ह्यात २४.६१ % एवढे आहे. गोंदिया जिल्ह्यात वनाच्छादित क्षेत्र ३६.७४%, चंद्रपूर जिल्ह्यात हे प्रमाण ३५.७२ एवढे आहे. गडचिरोलीमध्ये वनाच्छादित क्षेत्र सर्वाधिक असून हे प्रमाण ६९.४१ एवढे आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत मागील ३ वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान ३३ कोटी वृक्ष लागवडीचे  उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट तसेच लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन व संगोपन केवळ वन विभाग करू शकत नाही. यामुळे नागरिक, खाजगी संस्था, शाळा,महाविद्यालये, तसेच शासनाच्या सर्व विभागांच्या बैठका घेण्यात येत आहे. नागपूर महसूल विभागांतर्गत ६  जिल्ह्यांसाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत एकूण ५९४.५५ लाख वृक्ष लागवडीचे नियोजन आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यासाठी ९८.३९ लाख, वर्धा ८७.५१, भंडारा ५४.००, गोंदिया ७८.८९, चंद्रपूर १६७.१६ तर गडचिरोली
जिल्हयासाठी १०८.६० लाख वृक्षलागवडीचे नियोजन आहे. ३३ कोटी वृक्ष लागवडींतर्गत नागपूर महसूल विभागातील ६ जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे एकूण ५९४.५५ लाख उद्दिष्टांपैकी ५१४.३५ लाख रोपे कृत्रिम पुर्ननिर्मितीद्वारे लागवड व ८०.२० लाख रोपे नैसर्गिक पुनर्निर्मितीद्वारे संगोपन करण्यात येणार आहे .
पर्यावरण संरक्षणाच्या या मोहिमेत राज्याच्या प्रत्येक नागरिकाला सहभागी करून घेण्याच्या हेतूने महाराष्ट्र हरित सेना या महत्त्वाकांक्षी
उपक्रमात ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही मोहीम सन २०१७ पासून सुरू करण्यात आली असून नागपूर विभागात ७ लाख ६१ हजार १४९ सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र वनविभागाने वन संरक्षणासाठी नागरिकांचे संदेश, सूचना प्रशासनापर्यंत पोहचविण्यासाठी हॅलो फॅारेस्ट उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत १९२६ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध आहे .
प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार यांनी नागपूर विभागातील 33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमासंदर्भात जिल्हा निहाय पाच कोटी 94 लाख 56 हजार वृक्षलागवडीच्या उददीष्टाबाबत माहिती दिली. प्रधान मुख्य वन संरक्षक उमेश अग्रवाल यांनी स्वागत केले.यावेळी जिल्हानिहाय मोहीमेचा आढावा घेण्यात आला.

बालमृत्यू रोखण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरवडा 9 जूनपर्यंत राबविणार



·     पंधरवड्याला 28 मे पासून सुरुवात

·      या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


नागपूर, दि. 29 : अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करण्याचे उद्दिष्टसमोर ठेवून जिल्हा परिषदेतर्फे 9 जूनपर्यंत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे. या पंधरवड्यात शून्य ते 5 वर्षे वयोगटातील बालकांच्या घरी जाऊन अतिसार झालेल्या बालकांचा शोध घेतल्या जाणार असून त्यांना अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी व झिंक गोळ्यांचा वापर कशा प्रकारे करायचा याचे प्रात्यक्षित घरोघरी जाऊन देण्यात येणार आहे. त्याचवेळेस आरएस आणि झिंक गोळ्यांचे वाटप आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे. ज्या घरामध्ये पाच वर्षाच्या आतील बालक आहे तेथे मोफत औषधोपचार केला जात असून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकार  डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.
हा कार्यक्रम जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी या ठिकाणी राबविण्यात येत आहे. बालमृत्यू कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. तसेच यासंबंधी  जनजागृती  देखील करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात झिंक कोपरा तयार करण्यात आला आहे. सर्व प्राथमिक शाळा व निमशासकीय शाळांमध्ये स्वच्छतेबाबत आरोग्य सेवक-सेविका, आरोग्य सहाय्यक,द्यकीय अधिकाऱ्यांकडून  प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
पावसाळ्यामध्ये एकाही बालकाचा मृत्यू होणार नाही यासाठी सर्व सामाजिक संस्थेची मदत घेतली जात असून अतिसार पंधरवडा राबविण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महिला व बाल कल्याण विभाग तसेच शालेय विभाग यांचा सक्रीय सहभाग आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावर सर्व आरोग्य विभगातील अधिकारी व कर्मचारी, गाव पातळीवरील सर्व आशा, गटप्रवर्तकांना प्रशिक्षण
देण्यात आले आहे. पाच वर्षाखालील  1 लाख 32 हजार 58 लाभार्थी  या योजनेचा लाभ 9 जूनपर्यंत  घेणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. दीपक सेलोकर यांनी कळविले आहे.

तिरोड्यात सिलिंडरचा स्फोटः 15 दुकाने जळून खाक


तिरोडा.दि.30- तिरोडा येथे रेल्वेस्थानाकाजवळील एका गॅस वेल्डींगच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट झाल्याने सुमारे 15 दुकाने जळून खाक झाल्याची घटना आज रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर असे की, तिरोडा येथील रेल्वेस्थानक परिसरात नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी असलेल्या एका गॅस वेल्डींगच्या दुकानात आज रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्या. या स्फोटामुळे आगीने रौद्ररुप धारण करून रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 100 फुटापर्यंत असलेल्या  सुमारे 15 टपरीवजा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासन आणि अदानी समुहाच्या अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याचे वृत्त आहे.
या अग्निकांडाच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या काही दुकानांची नावे अशी आहेत.
1) बाबुलाल मेश्राम पान पॅलेस, 2) करीमभाई सायकल स्टोर्स, 3) एसके टेलर्स, 4) बारसागडे हेअर सलून, 5) अगरबत्ती दुकान, 6) साई फ्लॉवर शॉ आणि गौडाऊन, 7) एसबी ब्रदर शॉप, 8) फळाचे दुकान, 9) केशरवानी सायकल स्टोर्स आणि गॅस वेल्डींग, 10) तिवारी मोबाईल रिचार्ज शॉप. आणि अन्य काही दुकानाचा समावेश आहे.
 

Wednesday, 29 May 2019

जगात सर्वाधिक तापमान चंद्रपूर ४७.८ अंशावर




पुणे,दि.29 : देशाला मॉन्सूनची वाट पहात असला तरी, राज्यातील उष्मा अद्यापही कायम आहे. उलट कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशाची वाढ नोंदविण्यात आली असून, पुढील ३ दिवस अशीच स्थिती राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार गेला असून, आज(दि.29) जगात चंद्रपूर येथे सर्वाधिक ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मध्यमहाराष्ट्रात कमाल तापमानात नाशिकचा अपवाद वगळता सरासरी ३ ते ६ अंशांनी वाढ झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरी ४ ते ५ अंशाची वाढ झाली असून, पारा ४३ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. विदर्भात बुलडाणा वगळता इतर जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंशाच्या पुढे गेले आहे. याच बरोबर राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यामध्ये देखील चार अंशापर्यंत वाढ झाल्याने, रात्रीच्या उकाड्यात देखील वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस अशीच स्थिती राहील.
राज्यातील कमाल तापमान : मध्य महाराष्ट्र –  पुणे ३९.७, लोहगाव ४०.९, जळगाव ४३.६, कोल्हापूर ३८, महाबळेवर ३४.२, मालेगाव ४२.४, नाशिक ३८.५, सांगली ३९.४, सातारा ४१.२, सोलापूर ४३.८, मराठवाडा – उस्मानाबाद ४३.४, औरंगाबाद ४२, परभणी ४६.१, नांदेड ४४.५, बीड ४४.२, विदर्भ- अकोला ४५.६, अमरावती ४५.८, बुलडाणा ४१.७, ब्रम्हपुरी ४६.९, चंद्रपूर ४७.८, गोंदिया ४५.५, नागपूर ४७.५, वर्धा ४६.५, यवतमाळ ४५, कोकण- सांताक्रूझ ३४.३, रत्नागिरी ३३.६, डहाणू ३४.६.

29 may to 04 june 2019 Berar Times enewspaper





Thursday, 23 May 2019

राहुल गांधींसह,चव्हाण,शिंदे काँग्रेसचे ‘हे’ दिग्गज नेते पिछाडीवर

गोंदिया,दि.23 : देशातील लोकसभेच्या सर्वच जागेसह राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील ८६७ उमेदवारांच्या भाग्याचा निकाल लागण्यास सुरवात झाली आहे.जनतेत निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधीसह काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते पिछाडीवर चालले आहेत. नादेंड मधून अशोक चव्हाण, सोलापूरातून सुशीलकुमार शिंदे हे पिछाडीवर चाललेत दोन्ही मुख्यमंत्री.सुप्रिया सुळेंना सुध्दा विजयासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
राज्यात मुख्य लढत भाजपा-सेना युती विरूद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी झाली. वंचित बहुजन आघाडी आणि बसपाचे काही उमेदवारही काही दिग्गजांच्या विजयात अडसर ठरण्यााची शक्यता वर्तवण्यात येत होते.मात्र वंचित औऱगांबाद वगळता कुठेच काम करतांना दिसून येत नाही.तर काँग्रेसला मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे.राष्ट्रवादी मात्र आघाडीवर चालली आहे महाआघाडीत आहे. बऱ्याच एक्झिट पोल्सनी राज्यात भाजपा-शिवसेना युतीच्या बाजूने कौल दिला आहे. आता खरा निकाल काय लागतो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील ४८ मतदार संघात काय स्थिती आहे याची माहिती तुम्हााला इथे बघायला मिळेल.
औरगांबाद मध्ये चंद्रकात खैरे तिसर्या क्रमांकावर,बारामती व मावळमधून सुप्रिया सुळे व पार्थ पवार,नागपूरातून नाना पटोले पिछाडीवर चालले आहेत.
भंडारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुनिल मेंढे हे 7418,गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे अशोक नेते 2728 नेआघाडी वर आहेत.

कुणाची आघाडी, कुणाची पिछाडी?
मतदारसंघउमेदवार/पक्षआघाडी/पिछाडी
नंदुरबारहिना गावित (भाजपा)पिछाडीवर
के सी पाडवी (काँग्रेस)आघाडीवर
धुळेसुभाष भामरे (भाजपा)आघाडीवर
कुणाल पाटील (काँग्रेस)
जळगावगुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
उन्मेष पाटील (भाजपा)
रावेररक्षा खडसे (भाजपा)
डॉ. उल्हास पाटील (काँग्रेस)
बुलडाणाप्रतापराव जाधव (शिवसेना)आघाडीवर
राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
अकोलाप्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)
संजय धोत्रे (भाजपा)
अमरावतीनवनीत कौर राणा (राष्ट्रवादी)
आनंदराव अडसूळ (शिवसेना)आघाडीवर…
वर्धारामदास तडस (भाजपा)आघाडीवर
चारुलता टोकस (काँग्रेस)
रामटेककृपाल तुमाने (शिवसेना)आघाडीवर
किशोर गजभिये (काँग्रेस)
नागपूरनितीन गडकरी (भाजपा)आघाडीवर
नाना पटोले (काँग्रेस)
भंडारा-गोंदियानाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)
सुनील मेंढे (भाजपा)आघाडीवर
गडचिरोली-चिमूरअशोक नेते (भाजपा)आघाडीवर
डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस)
चंद्रपूरहंसराज अहीर (भाजपा)आघाडीवर
सुरेश धानोरकर (काँग्रेस)
यवतमाळ-वाशिममाणिकराव ठाकरे (काँग्रेस)पिछाडीवर
भावना गवळी (शिवसेना)आघाडीवर
हिंगोलीसुभाष वानखेडे (काँग्रेस)
हेमंत पाटील (शिवसेना) आघाडीवर
नांदेडअशोक चव्हाण (काँग्रेस)पिछाडीवर
प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजपा)
परभणीसंजय जाधव (शिवसेना)आघाडीवर
राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
जालनारावसाहेब दानवे (भाजपा)आघाडीवर
विलास औताडे (काँग्रेस)
औरंगाबादचंद्रकांत खैरे (शिवसेना)पिछाडीवर
सुभाष झांबड (काँग्रेस)
दिंडोरीभारती पवार (भाजपा)
धनराज महाले (राष्ट्रवादी)
नाशिकहेमंत गोडसे (शिवसेना)आघाडीवर
समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
पालघरराजेंद्र गावित (शिवसेना)
बळीराम जाधव (बविआ)
भिवंडीकपिल पाटील (भाजपा)
सुरेश टावरे (काँग्रेस)
कल्याणश्रीकांत शिंदे (शिवसेना)आघाडीवर
बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
ठाणेराजन विचारे (शिवसेना)आघाडीवर
आनंद परांजपे (राष्ट्रवादी)पिछाडीवर
मुंबई उत्तरऊर्मिला मातोंडकर (काँग्रेस)पिछाडीवर
गोपाळ शेट्टी (भाजपा)
मुंबई उत्तर पश्चिमसंजय निरुपम (काँग्रेस)
गजानन कीर्तिकर (शिवसेना)आघाडीवर
मुंबई उत्तर पूर्वसंजय दिना पाटील (राष्ट्रवादी)
मनोज कोटक (भाजपा)आघाडीवर
मुंबई उत्तर मध्यपूनम महाजन (भाजपा)आघाडीवर
प्रिया दत्त (काँग्रेस)
मुंबई दक्षिण मध्यराहुल शेवाळे (शिवसेना)आघाडीवर
एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
मुंबई दक्षिणमिलिंद देवरा (काँग्रेस)
अरविंद सावंत (शिवसेना)आघाडीवर
रायगडसुनील तटकरे (राष्ट्रवादी)१४०० मतांनी आघाडीवर
अनंत गिते (शिवसेना)
मावळपार्थ पवार (राष्ट्रवादी)पिछाडीवर
श्रीरंग बारणे (शिवसेना)
पुणेगिरीश बापट (भाजपा)आघाडीवर
मोहन जोशी (काँग्रेस)
बारामतीसुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)आघाडीवर
कांचन कूल (भाजपा)
शिरूरअमोल कोल्हे (राष्ट्रवादी)९ हजार मतांनी आघाडीवर
शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना)
अहमदनगरसुजय विखे (भाजपा)१२ हजार मतांनी आघाडीवर
संग्राम जगताप (राष्ट्रवादी)पिछाडीवर
शिर्डीसदाशिव लोखंडे (शिवसेना)आघाडीवर
भाऊसाहेब मल्हारी कांबळे (काँग्रेस)
बीडडॉ. प्रीतम मुंडे (भाजपा)3 हजारांनी आघाडीवर
बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)
उस्मानाबादओमराजे निंबाळकर (शिवसेना)आघाडीवर
राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)पिछाडीवर
लातूरसुधाकर शृंगारे (भाजपा)
मच्छिंद्र कामत (काँग्रेस)
 सोलापूरसुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)पिछाडीवर
जय सिद्धेश्वर स्वामी (भाजपा)
प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)
माढारणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजपा)
संजय शिंदे (राष्ट्रवादी)आघाडीवर
सांगलीसंजय पाटील (भाजपा)
गोपीचंद पडळकर (वंचित बहुजन आघाडी)
विशाल पाटील (स्वाभिमान) आघाडीवर
साताराउदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)आघाडीवर
नरेंद्र पाटील (शिवसेना)
रत्नागिरी-सिंधुदुर्गविनायक राऊत (शिवसेना)७ हजार मतांनी आघाडीवर
निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
कोल्हापूरसंजय मंडलिक (शिवसेना)१४ मतांनी आघाडीवर
धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
हातकणंगलेराजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)पिछाडीवर
धैर्यशील माने (शिवसेना)

नागपूरात मतमोजणी थांबविण्याची काँग्रेसची मागणी,राज्यात युती आघाडीवर

गोंदिया/नागपूर,दि.23ः- देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (दि..23) सकाळी 8 वाजेपासून सुरवात झालेली आहे.नागपूर व रामटके मतदारसंघाची मतमोजणी कळमना येथील मार्केट यार्ड मध्ये सुरु झाली असून नागपूरातील दोन विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमच्या मशीनच्या क्रमांकामध्ये घोळ असल्याने मतमोजणी थांबविण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने निवडणुक अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.त्यावर मतदान केंद्रावरील अधिकारी त्या मशीनचा तपास करीत असल्याचे वृत्त आहे.
राज्यात 48 मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरवात झाली असून नांदेड येथून अशोक चव्हाण ,औऱगांबाद येथून चंद्राकांत खैरा व रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत हे आघाडीवर असल्याचे चित्र असून हातकगंणकले येथून स्वाभीमानचे राजू शेट्टी पिछाडीवर असल्याचे वृत्त आहे. सोलापूर येथून सुशिलकुमार शिंदे समोर आहेत. 48 पैकी 47 ठिकाणातील कल समोर येत आहेत.यात भाजप 20,शिवसेना 11,काँग्रेस 6 व राष्ट्रवादी 10 ठिकाणी समोर असल्याचे वृत्त येत आहेत.
बारामतीमधून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे फक्त 1800 मतांनी आघाडीवर
भंडारा-गोंदियातून भाजपचे सुनिल मेंढ आघाडीवर
नागपूरातून नितिन गडकरी आघाडीवर
नंदुरबार मधून काँग्रेस आघाडीवर
धुळ्यात सुभाष भामरे आघाडीवर
शिरुर मधून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आघाडीवर
लोकसभा निवडणूक निकालांचे कल येण्यास सुरुवात…नांदेडमधून काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण आघाडीवर….महाराष्ट्रात भाजपची आघाडी
कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेचे संजय मंडलिक 12 हजारने आघाडीवर
अमरावती मध्ये शिवसेनेचे अनंत अडसुळ आघाडीवर
रायगड मधून राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे आघाडीवर
मुंबईतून उर्मिला मार्तोंडकर या पिछाडीवर चालल्या आहेत.
नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे समिर भुजबळ मागे,शिवसेनेचे श्रीकांत गोडसे आघाडीवर
परभणी मधून शिवसेनेचे उमेदवार आघाडी
मावळमध्ये राष्ट्रवादीचे पार्थ पवार पिछाडीवर ,तर भाजपचे श्रीकांत बारणे आघाडीवर
बुलडाणा येथून राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर
बीड मधून प्रीतम मुंडे 3 हजाराने आघाडीवर
नगरमधून सुजय विखे पाटील पिछाडीवर
वर्धा येथून भाजपचे रामदास तडस आघाडीवर

Saturday, 18 May 2019

राज्यातील तापमानात वाढ होणार

मुंबई, दि. 18 : राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ,मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील.
या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान 46 अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान 47 अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विदर्भातल्या उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान 45 अंशापर्यंत पोहचेल.
उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान 42 अंशाच्या आसपास राहील असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 18 ते 21 मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. वाढत्या तापमानापासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सुरक्षा रक्षकाची नोकरी लावून देण्याच्या नावावर ४२ लाख लुबाडले

पिडीतांनी नोंदविली तिरोडा पोलीसात लेखी तक्रार
गोंदिया,दि.१8-आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षक पदावर नौकरी लावून देण्याच्या नावावर ३५ हजार रुपये प्रती 142 व्यक्ती घेऊन सुमारे ४२ लाख रुपये हडप करुन फसवणुक करणारा पुरुषोत्तम सोनेकर (मु.तिरोडा) हा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असल्याचे समोर आले आहे.
सुरक्षा रक्षक कंपनीच्या माध्यमातून नौकरी लावून देण्याच्या नावावर त्यांने जिल्ह्यातील १५०- २०० जणांची फसवणूक केल्याप्रकरणी पिडीत  आनंदकुमार अनंतराम चौर(देवरी),दुर्गाप्रसाद डोहरे(अंधियाटोला,जि.बालाघाट),विजयqसह नयकाने(महालगाव,गोंदिया),दिलीप उके(फुटाणा,देवरी),अनुप मेश्राम(एकोडी,गोंदिया),प्रितकुमार बनसोड(ढाकणी)वर्षा हरिणखेडे(तिरोडा),दिक्षिता विकास हुमने(गोंदिया) व राजेंद्र रिनायत(सेजगाव,गोंदिया) यां तक्रारदारांनी स्ट्रांग सिक्युरिटी गार्ड कंपनी बुटीबोरी(नागपूर)चे सुपरवायझर पुरुषोत्तम सोनेकर विरुध्द तिरोडा पोलीसात लेखी तक्रार नोंदविली आहे.गैरअर्जदार हा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असल्याने पोलीस विभाग कितपत इमाने इतबारे या प्रकरणात चौकशी करुन पिडितांना न्याय देते याकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक  प्राथमिक आरोग्य केंद्रात सिक्युरिटी म्हणून नोकरी लावून देण्याच्या नावावर गैरअर्जदारांने प्रत्येकी ३५ हजार रुपयाची मागणी करीत सिक्युरीटी गार्ड,सुपरवायजर पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दिले.त्या आमिषाला बळी पडून तिरोडा येथील कार्यालयात जाऊन ३५ हजार रुपये भरुन त्याची पावती सुध्दा घेतली.त्यानंतर १५० ते २०० गार्डची आवश्यकता असल्याचे आम्हाला सांगितल्यावर आम्ही गावागावत जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात गार्डची गरज असल्याचा प्रचार केल्यानंतरही आम्हाला व ज्यांनी गार्डकरीता पैसे दिले त्यांना नौकरी दिली नाही.उलट त्यानंतर भुलथापा देऊन टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आले.२ फेबुवारी रोजी गैरअर्जदारांने आम्हा सर्वांना बोलावून पैसे दिल्याची मूळ पावती परत घेऊन स्वतःकडे ठेवून प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षक नेमणुकीचे नौकरीचे आदेश तयार करुन दिले.त्या पत्रानुसार आम्ही संबधित प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन  विचारणा केली असता कुठल्याही प्रकारे सिक्युरीटी गार्ड भरण्याबाबत शासनाकडून पत्रव्यवहार आलेला नसल्याचे कळले.त्यानंतर जेव्हा आम्ही परत गैरअर्जदाराकडे गेलो तेव्हा उडवा उडवीचे उत्तर देत मंत्रालयातून आदेश येण्यास वेळ लागत असल्याचे सांगितले.तसेच गैरअर्जदारानी बुटीबोरी येथील कंपनीच्या कार्यालयात जाऊन विचारपूस केली असता कंपनीचे संचालक डी.टी.लोहावे यांनी याबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिरोडा येथे परत येऊन दिलेले पैसे परत मागताच सोनेकर यांनी उडवाउडवीची उत्तर देत तुम्हाला जे करायचे करा माझे कुणीही काही करु शकत नाही अशी दमदाटी केल्याप्रकरणी तिरोडा पोलीसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

वाडीचे भाजप नगराध्यक्ष लाच घेताना जाळ्यात

नागपूर,दि,१८ः- खासगी संस्थेच्या बिलाची रक्कम काढून देण्यासाठी २0 हजार रुपयांची लाच स्वीकारणारे वाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रेमनाथ आत्माराम झाडे (४८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) खात्याच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बिडीपेठ, छोटी खदान, नागपूर निवासी तक्रारदार हे एका सहकारी संस्थेचे अध्यक्ष आहेत. ही संस्था शासकीय कार्यालयांना विविध कामांसाठी मनुष्यबळ पुरविण्याचे काम करते. त्याचप्रमाणे शासकीय कंत्राट घेऊन संस्थेसाठी आर्थिक स्रोत निर्माण करते. या संस्थेला नगर परिषद वाडी येथे मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट मिळाले. मिळालेल्या कंत्राटाप्रमाणे तक्रारदाराने नगर परिषदेला कंत्राटी तत्त्वावर संस्थेमार्फत ३ स्थापत्य अभियंता पुरविले होते. त्यांचे डिसेंबर २0१८ ते मार्च २0१९ असे एकूण चार महिन्यांचे थकीत पगार झाडे याने काढून दिले. त्याच्या मोबदल्यास २४ हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती.
त्यांनी एसीबीचे कार्यालय गाठून तक्रार नोंदविली. अधिकार्‍यांनी मिळालेल्या तक्रारीची खात्री करून शुक्रवार १७ मे रोजी सापळा रचला. या कारवाईसाठी एसीबीने भंडार्‍यातील अधिकार्‍याची नेमणूक केली. ठरल्याप्रमाणे तक्रारदार झाडेकडे गेले. २४ हजार रुपये देऊ शकत नाही, असे तक्रारदराने म्हटले. यावर तडजोड होऊन २0 हजार रुपये देण्याचे ठरले. झाडेने २0 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध वाडी येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक (अतिरिक्त कार्यभार) श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात भंडारा येथील उपअधीक्षक महेश चाटे, पोलीस निरीक्षक योगेश्‍वर पारधी, पोना सचिन हलमारे, अश्‍विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, शेखर देशकर, पोलिस शिपाई सुनील हुकरे, चालक दिनेश धार्मिक, प्रभाकर बले, अमोर फिस्के यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
नगराध्यक्ष प्रेम झाडे सकाळी घरातून वॉर्डात जाण्यासाठी निघाले. तेव्हा खाडे नामक व्यक्तीने त्यांच्या हाती एक लिफाफा सोपविला. काही महत्त्वाचे कागद असतील म्हणून त्यांनी उत्सुकतेने लिफाफा उघडून बघितला. त्या ठिकाणी कागदाऐवजी २0 हजार रुपयांची रक्कम होती. काही समजण्यापूर्वीच बाहेर दबा धरून बसलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचार्‍यांनी पकडले. त्यानंतर त्यांना नागपूर स्थित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. इकडे दुसर्‍या दलाने संपूर्ण घराला ताब्यात घेऊन सकाळी ११ वाजेपासून घराची झाडाझडती घेणे सुरू केले. त्यांचा मूळ व्यवसाय, लॉन, इमारत, नगदी रोख, दागिने, स्थावर संपत्ती इत्यादींची माहिती गोळा केली.

नक्षलवाद्यांनी पत्रकातून स्वीकारली भूसुरूंग स्फोटाची जबाबदारी

गडचिरोली,दि.18 : जिल्ह्यातील भामरागड-आरेवाडा या नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांनी पत्रके टाकत त्या पत्रकांमध्ये कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे १ मे रोजी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. १९ मे रोजी रविवारी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात बंदचे आवाहन केले आहे. यासाठी एटापल्ली, भामरागड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलपत्रके टाकली.
या पत्रकांमध्ये जांभुळखेडाच्या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. मागील वर्षी भामरागड तालुक्यातील कसनासूर येथे ४० नक्षलवादी ठार झाले होते. या घटनेचा बदला घेण्यासाठी जांभुळखेडा येथे भूसुरूंग स्फोट घडवून आणला आहे. हा भूसुरूंग स्फोट घडवून आणण्यात सहकार्य करणा-या स्थानिक नक्षलवाद्यांचे कौतुकसुद्धा पत्रकातून केले आहे. तसेच सरकारच्या नितीवर जोरदार टीका केली आहे.सुरजागड लोहप्रकल्पालाही नक्षलवाद्यांनी विरोध दर्शविला आहे. दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात नक्षलपत्रके टाकून नक्षलवादी आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच रविवारी १९ मे रोजी बंदचे आवाहन केल्याने दुर्गम भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे नक्षलवाद्यांच्या स्फोटात त्यांना मरण आले

एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे नक्षलवाद्यांच्या स्फोटात त्यांना मरण आले ते अतिशय क्लेशदायक आहे. आमचे संसार उद्ध्वस्त करणाºया त्या अधिका-याला निलंबित करा. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी आर्त मागणी शहीद पोलीस जवानांच्या वीरपत्नींनी केली आहे.१ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरूंग स्फोटात कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) शैलेश काळे यांच्या नेतृत्वाखालील क्युआरटी पथकातील १५ जवान आणि त्यांना घेऊन जाणा-या खासगी मालवाहू वाहनाच्या चालकाला वीरमरण आले. त्यातून सावरत आठ शहीद जवानांच्या वीरपत्नी व एका जवानाच्या बहिणीसह इतर कुटुंबियांनी गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले.काळे यांची नंदुरबार येथे बदली करण्यात आली. पण त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. याचा अर्थ पोलीस विभाग त्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते, असे वीरपत्नी म्हणाल्या

जेसीबीचा पंजा लागून मजुराचा मृत्यू




भंडारा,दि.18: जिल्ह्यातील रोहा येथील वैनगंगा नदी पात्रात शुक्रवारी रात्री अवैध रेती उत्खनन करणाऱ्या जेसीबी मशीनचा धक्का लागून नवनीत संजय सिंदपुरे (१९) हा मजूर जागीच ठार झाल्याची घटना घडली. 
या घटनेमुळे अवैध रेती उत्खननाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नवनीत सिंदपुरे हा आपला मित्र चेतन उके याच्यासोबत शुक्रवारी रात्री नदीपात्रात गेला होता. तेथे सुरु असलेल्या अवैध उत्खननात जेसीबीचा पंजा डोक्याला लागल्याने नवनीत जागीच ठार झाला. नवनीत सिंदपुरे ९ व्या वर्गात शिकत होता. काल आपल्या आजोबा कडे रोहा येथे आला होता.विशेष म्हणजे न्यायालयाने रेती उत्खन्नावर बंदी घातलेली असतानाही रात्रीला रेतीचा अवैध उपसा होणे हा न्यायालयाचा अवमान असून महसूल व पोलीस विभागाचे साटेलोटेच म्हणावे लागणार आहे.

१८ शेतमजूरांना जेवणातून विषबाधा

अकोला,दि.18ः- जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील कार्ला येथील एका शेतात कांदा मळणीच्या कामासाठी आलेल्या मजुराना जेवनातून विषबाधा झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. या सर्व मजुरांनार उपचाराकरीता आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती ठीक असल्याचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.फैजान असलम यांनी सांगितले.
पातूर तालुक्यातील कार्ला शेत शिवारात कांदा मळणीचे काम सुरू आहे. यासाठी खामगाव तालुक्यातील अटाळी व पातुर तालुक्यातील तुलंगा येथील २६ मजूर काम करण्यासाठी कारला या गावांमध्ये आले होते. आज सकाळी अचानक यातील काही लोकांना मळमळ,उलट्या,पोट दुखणे,संडास असा त्रास सुरु झाल्यांने त्यांनी सकाळीच जवळच असलेल्या आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेऊन उपचार घेतले. उपचार दरम्यान त्यांना विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले.त्यामध्ये अविनाश भोसले, सुनील चव्हाण ,अरुण पवार, शालू भोसले, दिव्या चव्हाण, पल्लवी चव्हाण ,दिलीप पवार, वैजांती भोसले, प्रवीण काळे, खडकाळ सिंग पवार, जनाबाई पवार, देव चव्हाण, साहिल भोसले ,महेश भोसले ,वैशाली भोसले यांचा समावेश आहे. यामध्ये काही महिला व लहान मुलांचा समावेश असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फैजान असलम यांनी सांगितले. दरम्यान बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुट्टी असूनही वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फैजान असलम हे प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होते. त्यामुळे शेतमजुरांना योग्य उपचार मिळाला.यावेळी डॉक्टरांना मदतीसाठी फार्मासिस्ट संदीप लांडगे परिचारिका इंगळे साबळे आदि कर्मचारी उपस्थित होते

Friday, 17 May 2019

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांची आकस्मिक भेट




गोंदिया,दि.17 :- शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात आढळलेल्या मुदतबाह्य औषधप्रकरणाच्या तपासासाठी जिल्हाधिकार्यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता केलेल्या रुग्णालयाच्या पाहणीने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
चौकशी समितीच्या सदस्यांनी खरोखरच रुग्णालयात येऊन चौकशी अहवाल तयार केला आहे की नाही हे सुध्दा बघणे या भेटीमागचा उद्देश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.१५ मे रोजी सकाळी १० वाजता आकस्मिक भेट देवून वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालयाचे निरिक्षण केल्याने एकच धावपळ उडाली होती. विशेष म्हणजे जेव्हा जिल्हाधिकारी बलकवडे या रुग्णालयात पोचल्या त्यावेळी मात्र मिळालेल्या माहितीनुसार फक्त 3 वैद्यकिय अधिकारी हजर होते.तर दररोज विदर्भ एक्सप्रेसने येऊन सेवा देणारे अधिकारी कर्मचारी मात्र गैरहजर होते असे बोलले जात आहे. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्ही.पी.रूखमोडे, अधिक्षक डॉ.नंदकिशोर जायस्वाल व इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी बलकवड यांनी निरिक्षणादरम्यान रूग्णालयातील पिण्याचे पाणी व स्वच्छतेचा संदर्भात रूग्णालय प्रशासनाला निर्देशही दिले. नुकतेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मुदतबाह्य औषधी व इंजे्नशमुळे चर्चेत आले होते. याप्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी बलकवडे यांनी चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली होती. त्या समितीने रुग्णालयाची पाहणी करुन आपला अहवाल नुकताच सादर केलेला आहे.त्यानंतर या रुग्णालयाची अचानक पाहणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी वार्ड क्रमांक १ व २ व आईसीयुमध्ये जाऊन रूग्णाची तसेच त्यांच्या कुटूंबियाशी चर्चा करून माहितीघेतली तसेच परत मुदतबाह्य औषधी दिल्या जात तर नाही याची खात्री करून घेतली. सध्या उन्हाळयाचे दिवस असून उष्माघात तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकार्यांनी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासंदर्भात रूग्णालय प्रशासनाला दिशानिर्देश दिले. तसेच स्वच्छतेकडे लक्ष देण्याचेही निर्देश दिले. सांडपाणी वाहुन जाणाऱ्या नालीचीही पाहणी केली व फुटलेल्या नाल्या दुरूस्त करून देण्यासाठी निर्देश दिले. सदर बोरवेल त्वरित सुरू करण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी महोदयांनी दिले.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...