गडचिरोली दि.१३: एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील ऐमलीवरुन मंगूठा गावाकड़े जाणाऱ्या मार्गावरील पंतप्रधान ग्राम सड़क योजनेच्या कामावरील वाहनाना नक्षल्या़नी आग लावल्याची घटना मध्यरात्री घडली.
त्यामध्ये टँकर, दोन सिमेंट कॉक्रेट मिक्सर मशीन, रोड रोलर व सेंट्रिंग वापराचे साहित्य साहित्याचा समावेश आहे.यवतमाळच्या शाम बाबा कंट्रक्शन कंपनीचे अनिल सेवदा नामक ठेकेदाराला रस्ता बांधकामाचे कंत्राट असल्याची माहिती समोर आली आहे.जाळण्यात आलेली वाहने व साहित्य एटापल्ली नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार यांचे मालकीचे असल्याचे माहिती आहे.गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात नक्षली दहशत पसरली आहे
No comments:
Post a Comment