Wednesday, 8 May 2019

महात्मा गांधी विद्यालयाला आग

वर्धा दि. ०७ : : स्थानिक वर्धा बस स्थानक शेजारी असलेल्या महात्मा गांधी विद्यालय तथा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाला सोमवारी २ वाजताच्या सुमारास अचानक लागली. 
यात तीन वर्गखोल्यांसह भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील साहित्य जळून कोळसा झाले. ही शाळा जि.प. प्रशासनाच्या मालकीची असून सदर घटनेमुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.महात्मा गांधी विद्यालयाला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जि.प.अध्यक्ष नितीन मडावी व मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आगीची माहिती मिळताच जि.प. अध्यक्ष मडावी, शिक्षण व आरोग्य समिती सभापती जयश्री गफाट, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. ओंबासे आदींनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. प्रयोगशाळा व इतर साहित्य जळाल्याने सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
प्राप्त माहितीनुसार, दुपारी भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनेची माहिती पोलीस विभागासह नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. शिवाय आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले; पण तोपर्यंत संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाले. या आगीत भौतिकशास्त्र प्रयोग शाळा, महात्मा गांधी विद्यालयाच्या तीन वर्ग खोल्या व एका स्वयंपाक खोलीतील साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे सुमारे ५ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी घटनास्थळ गाठले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...