पिडीतांनी नोंदविली तिरोडा पोलीसात लेखी तक्रार
गोंदिया,दि.१8-आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षक पदावर नौकरी लावून देण्याच्या नावावर ३५ हजार रुपये प्रती 142 व्यक्ती घेऊन सुमारे ४२ लाख रुपये हडप करुन फसवणुक करणारा पुरुषोत्तम सोनेकर (मु.तिरोडा) हा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असल्याचे समोर आले आहे.
सुरक्षा रक्षक कंपनीच्या माध्यमातून नौकरी लावून देण्याच्या नावावर त्यांने जिल्ह्यातील १५०- २०० जणांची फसवणूक केल्याप्रकरणी पिडीत आनंदकुमार अनंतराम चौर(देवरी),दुर्गाप्रसाद डोहरे(अंधियाटोला,जि.बालाघाट), विजयqसह नयकाने(महालगाव,गोंदिया),दिलीप उके(फुटाणा,देवरी),अनुप मेश्राम(एकोडी,गोंदिया),प्रितकु मार बनसोड(ढाकणी)वर्षा हरिणखेडे(तिरोडा),दिक्षिता विकास हुमने(गोंदिया) व राजेंद्र रिनायत(सेजगाव,गोंदिया) यां तक्रारदारांनी स्ट्रांग सिक्युरिटी गार्ड कंपनी बुटीबोरी(नागपूर)चे सुपरवायझर पुरुषोत्तम सोनेकर विरुध्द तिरोडा पोलीसात लेखी तक्रार नोंदविली आहे.गैरअर्जदार हा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असल्याने पोलीस विभाग कितपत इमाने इतबारे या प्रकरणात चौकशी करुन पिडितांना न्याय देते याकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सिक्युरिटी म्हणून नोकरी लावून देण्याच्या नावावर गैरअर्जदारांने प्रत्येकी ३५ हजार रुपयाची मागणी करीत सिक्युरीटी गार्ड,सुपरवायजर पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दिले.त्या आमिषाला बळी पडून तिरोडा येथील कार्यालयात जाऊन ३५ हजार रुपये भरुन त्याची पावती सुध्दा घेतली.त्यानंतर १५० ते २०० गार्डची आवश्यकता असल्याचे आम्हाला सांगितल्यावर आम्ही गावागावत जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात गार्डची गरज असल्याचा प्रचार केल्यानंतरही आम्हाला व ज्यांनी गार्डकरीता पैसे दिले त्यांना नौकरी दिली नाही.उलट त्यानंतर भुलथापा देऊन टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आले.२ फेबुवारी रोजी गैरअर्जदारांने आम्हा सर्वांना बोलावून पैसे दिल्याची मूळ पावती परत घेऊन स्वतःकडे ठेवून प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षक नेमणुकीचे नौकरीचे आदेश तयार करुन दिले.त्या पत्रानुसार आम्ही संबधित प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन विचारणा केली असता कुठल्याही प्रकारे सिक्युरीटी गार्ड भरण्याबाबत शासनाकडून पत्रव्यवहार आलेला नसल्याचे कळले.त्यानंतर जेव्हा आम्ही परत गैरअर्जदाराकडे गेलो तेव्हा उडवा उडवीचे उत्तर देत मंत्रालयातून आदेश येण्यास वेळ लागत असल्याचे सांगितले.तसेच गैरअर्जदारानी बुटीबोरी येथील कंपनीच्या कार्यालयात जाऊन विचारपूस केली असता कंपनीचे संचालक डी.टी.लोहावे यांनी याबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिरोडा येथे परत येऊन दिलेले पैसे परत मागताच सोनेकर यांनी उडवाउडवीची उत्तर देत तुम्हाला जे करायचे करा माझे कुणीही काही करु शकत नाही अशी दमदाटी केल्याप्रकरणी तिरोडा पोलीसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment