देवरी,दि.15 - देवरीपासून उत्तरेस सुमारे 3 किलोमीटर अंतरावरील चौरागडे बगीच्या नजीक नवनिर्मित देवरी आमगाव राष्ट्रीय महामार्गावर दोन मोटार सायकलींमध्ये सामोरासमोर झालेल्या घडकेच 1 जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज (दि.15) दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.
मृतामध्ये विजय भोजराज चौधरी (वय 22) राहणार सालेगाव, तालुका देवरी याचा समावेश आहे. गंभीर जखमींमध्ये मंगेश नामदेव कापसे (वय 25) राहणार भागी (चिचगड) , तालुका देवरी आणि प्रियंका तेजराम वट्टी (वय18) राहणार सालेगाव यांचा समावेश असून योगंश नामदेव कापसे (वय 22) राहणार भागी चिचगड आणि प्रमिला तेजराम वट्टी (वय 55) राहणार सालेगाव हे जखमी झाले आहेत. जखमींवरी देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी गोंदिया येथे पाठविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगेश हा आपला भाऊ योगेश यासह देवरीकडून आमगावच्या दिशेने आपल्या दुचाकी (क्र. एमएच 35 टी 1809) ने जात होता. तर मृत विजय हा वट्टी कुटुंबातील मायलेकींना घेऊन आपल्या दुचाकीने (क्र. एमएच35 एएफ 2748) देवरीच्या दिशेने येत असताना दोन्ही वाहनांमध्ये चौरागडे बगिच्या नजीक सामोरासमोर जोरदार धडक झाली. घटनेची नोंद देवरी पोलिसांत झाली असून पुढील तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment