Tuesday, 14 May 2019

वैनगंगेत बुडून तरुणाचा मृत्यू

पवनी,दि.१४ :उमरेड व नागपूर येथून पवनीला फिरायला आलेले सात मित्र वैनगंगा नदीच्या पुलाच्या खाली खोल पाण्यात आंघोळ करीत असताना स्नेहल किशोर नंदेश्‍वर (२१) रा.उमरेड खोल पाण्यात बुडाला. सोबत असलेल्या मित्रांचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. मदतीसाठी पोहचलेल्या लोकांनी स्नेहलला पाण्याबाहेर काढले. मात्र रूग्णालयात पोहचण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.
स्नेहल किशोर नंदेश्‍वर, प्रज्वल राजेश बावने (१९) रा.नागपूर, प्रज्वल अशोक मोटघरे (१९) रा.उमरेड, दुर्गेश रूपचंद कुहीके (२१) रा.नागपूर, हर्षल राजेश बावने (१७) रा.नागपूर, महेश खुशाल बावने (१८) रा.नागपूर व शैलेश रूपचंद कुहीके (१९) रा. नागपूर हे सर्व मित्र पवनीला फिरायला आले होते. वैनगंगा नदीच्या पुलाजवळचे पाणी पाहून त्यांना आंघोळीचा मोह झाला. सर्व खोल पाण्यात शिरले व आंघोळ करू लागले. त्यांच्यापैकी स्नेहल नंदेश्‍वर हा युवक खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड करून लोकांना मदत मागीतली. लोक मदतीला धावून आले. स्नेहलला पाण्याबाहेर काढण्यात आले. रूग्णालयात पोहचण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. पवनी पोलिसांनी र्मग दाखल करून उत्तरीय तपासनीनंतर त्याचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...