तिरोडा.दि.30- तिरोडा येथे रेल्वेस्थानाकाजवळील एका गॅस वेल्डींगच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट झाल्याने सुमारे 15 दुकाने जळून खाक झाल्याची घटना आज रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर असे की, तिरोडा येथील रेल्वेस्थानक परिसरात नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी असलेल्या एका गॅस वेल्डींगच्या दुकानात आज रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्या. या स्फोटामुळे आगीने रौद्ररुप धारण करून रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 100 फुटापर्यंत असलेल्या सुमारे 15 टपरीवजा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासन आणि अदानी समुहाच्या अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याचे वृत्त आहे.
या अग्निकांडाच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या काही दुकानांची नावे अशी आहेत.
1) बाबुलाल मेश्राम पान पॅलेस, 2) करीमभाई सायकल स्टोर्स, 3) एसके टेलर्स, 4) बारसागडे हेअर सलून, 5) अगरबत्ती दुकान, 6) साई फ्लॉवर शॉ आणि गौडाऊन, 7) एसबी ब्रदर शॉप, 8) फळाचे दुकान, 9) केशरवानी सायकल स्टोर्स आणि गॅस वेल्डींग, 10) तिवारी मोबाईल रिचार्ज शॉप. आणि अन्य काही दुकानाचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment